agriculture news in marathi, tur procurment process stop due to storage problem, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात गोदामे ‘फुल्ल’; तूर खरेदी अडचणीत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018
यवतमाळ  : मागील वर्षीपासून तूर खरेदीच्या अडचणी कायम आहे. यंदाही अडचणी संपलेल्या नाहीत. शासकीय आदेशाप्रमाणे मोजकेच दिवस तूर खरेदीसाठी शिल्लक असतानाच आता जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम फुल्ल झाले आहे. त्यामुळे तूर साठवणुकीसाठी जागेचे नवे संकट उभे राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
यवतमाळ  : मागील वर्षीपासून तूर खरेदीच्या अडचणी कायम आहे. यंदाही अडचणी संपलेल्या नाहीत. शासकीय आदेशाप्रमाणे मोजकेच दिवस तूर खरेदीसाठी शिल्लक असतानाच आता जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम फुल्ल झाले आहे. त्यामुळे तूर साठवणुकीसाठी जागेचे नवे संकट उभे राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तुरीचे समाधानकारक उत्पादन झाले आहे. मात्र, तूर विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना तूर विक्री करताना नाकी नऊ आले होते. त्यातून धडा घेत नियोजन केल्या जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
 
जिल्ह्यात नाफेडने खरेदी केलेली तूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक केली जाते. राज्य वखार महामंडळाचे गोदामाची साठवण क्षमता १३ हजार १२० मेट्रिक टन आहे. त्यापैकी दहा हजार मेट्रिक टन जागा भारतीय खाद्य निगमकरिता राखीव आहे. उर्वरीत जागेत सीसीआय, इतर एजन्सीचा माल ठेवण्यात येतो. राज्य वखार महामंडळाकडे सध्या पाचशे टन तूर साठवणूक करता येईल, इतकीच जागा शिल्लक आहे. लवकरच ही जागा ‘फुल’ होण्याची शक्‍यता आहे.
 
केंद्रीय वखार महामंडळाचे तीन गोदाम आहे. हे तीन गोदामे आधीच पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत नाफेडच्या खरेदी केंद्रावर घेतलेली तूर साठवणूक करण्याची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. राज्य वखार महामंडळाने आठ गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. त्या गोदामातही साठवूण झाली आहे. परिणामी, आता साठवणुकीची नवी समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
 

 राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मागील वर्षीची साडेतीन हजार टन तूर साठवलेली आहे. केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातही मागील वर्षीची तूर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यंदा तूर ठेवण्याची अडचण आल्यास त्यांचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

 
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सध्या ५०० ते ६०० क्विंटल तूर बसेल इतकीच जागा शिल्लक आहे. आतापर्यंत सात हजार मेट्रिक टन तुरीची साठवणूक गोदामात करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे साठा अधीक्षक श्री. दिवटे यांनी दिली.
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...