agriculture news in marathi, Tur productivity in Marathwada proposed be at 10 quintal 65 kilo | Agrowon

मराठवाड्यात तुरीची हेक्‍टरी १० क्‍विंटल ६५ किलो उत्पादकता प्रस्तावित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

औरंगाबाद :  येत्या खरिपात मराठवाड्यातील प्रमुख पिकांची गत हंगामात आलेली उत्पादकता लक्षात घेऊन उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये तुरीचे हेक्‍टरी १० क्‍विंटल ६५ किलो उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे. शिवाय कापसाच्या रुईचे गत हंगामात हेक्‍टरी २ क्‍विंटल १४ किलो असलेले उत्पादन हेक्‍टरी ३ क्‍विंटल २५ किलो प्रस्तावित करण्यात आले आहे. 

औरंगाबाद :  येत्या खरिपात मराठवाड्यातील प्रमुख पिकांची गत हंगामात आलेली उत्पादकता लक्षात घेऊन उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये तुरीचे हेक्‍टरी १० क्‍विंटल ६५ किलो उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे. शिवाय कापसाच्या रुईचे गत हंगामात हेक्‍टरी २ क्‍विंटल १४ किलो असलेले उत्पादन हेक्‍टरी ३ क्‍विंटल २५ किलो प्रस्तावित करण्यात आले आहे. 

राज्यस्तरीय खरिपाच्या आढावा नियोजनात मराठवाड्यातील पिकनिहाय प्रस्तावित उत्पादकतेचा आराखडा मांडण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, समूह शेती आदींचा प्रभावी वापर करून येत्या खरिपात प्रत्येक पिकाची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. २०१७-१८ मध्ये मराठवाड्यात ज्वारीची १ लाख ५५ हेक्‍टरवर पेरणी झाली, तर उत्पादकता हेक्‍टरी ८ क्‍विंटल ६ किलो आली होती. 

येत्या खरिपात ज्वारीचे क्षेत्र ३ लाख ४५ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले असून, उत्पादकता हेक्‍टरी ९ क्‍विंटल ९० किलो प्रस्तावित करण्यात आली आहे. गत हंगामात बाजरीची १ लाख ३६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली, तर उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल ९९ किलो आली होती. येत्या खरिपात १ लाख ६९ हजार हेक्‍टरवर बाजरीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आली असून, हेक्‍टरी ६ क्‍विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. मकाची गत हंगामात २ लाख ८० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली, तर उत्पादकता हेक्‍टरी १३ क्‍विंटल २२  किलो आली होती. येत्या खरिपात मकाचे क्षेत्र ३ लाख ४० हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले असून, उत्पादकता हेक्‍टरी १५ क्‍विंटल ८५ किलो प्रस्तावित करण्यात आली आहे.

गत खरिपात मुगाची १ लाख ८९ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली तर हेक्‍टरी २ क्‍विंटल ७२ किलो उत्पादन झाले होते. येत्या खरिपात मुगाचे क्षेत्र २ लाख २४ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले असून, उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल ८५ किलो प्रस्तावित करण्यात आली आहे. गत खरिपात उडदाची १ लाख ८३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती, तर उत्पादकता हेक्‍टरी ३ क्‍विंटल ५५ किलो आली होती. येत्या खरिपात उडदाचे क्षेत्र २ लाख ३ हजार हेक्‍टरवर तर उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ५ किलो प्रस्तावित करण्यात आली आहे. 

सोयाबीनची गत हंगामात १७ लाख २५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. तर उत्पादन हेक्‍टरी ८ क्‍विंटल ५६ किलो आली होती. येत्या खरिपात १५ लाख ५२ हजार हेक्‍टरवर सोयाबीनचे  क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, उत्पादन हेक्‍टरी १० क्‍विंटल ५५ किलो प्रस्तावित करण्यात आले आहे. गत खरिपात १५ लाख ९२ हजार हेक्‍टरवर लागवड झालेले कपाशीचे क्षेत्र येत्या खरिपात १६ लाख २१ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. 

पिकनिहाय सरासरी उत्पादकता (हेक्‍टरी)

ज्वारी ८ क्‍विंटल २४ किलो
बाजरी ४ क्‍विंटल ०८ किलो.
मका १० क्‍विंटल ०९ किलो
तूर ७ क्‍विंटल १० किलो
मूग ४ क्‍विंटल ०२ किलो
उडीद ४ क्‍विंटल २१ किलो
सोयाबीन ८ क्‍विंटल ७६ किलो
कापूस २ क्‍विंटल ६८ किलो

 

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...