agriculture news in marathi, tur prodution decrease, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता सरासरीपेक्षा कमी 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप हंगामातील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ९ किलो (एकरी २.०३ क्विंटल) आली आहे. संयुक्त पीककापणी प्रयोगांच्या निष्कर्षांच्या विश्लेषणानंतर ही स्थिती स्पष्ट झाली. यंदा जिल्ह्यात तुरीची सरासरी उत्पादकता गेल्या ५ वर्षांतील सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी आली आहे. १६ पैकी ११ तालुक्यांची उत्पादकता सरासरीपेक्षा कमी, तर ५ तालुक्यांची उत्पादकता सरासरीपेक्षा अधिक आल्याचे आढळले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप हंगामातील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ९ किलो (एकरी २.०३ क्विंटल) आली आहे. संयुक्त पीककापणी प्रयोगांच्या निष्कर्षांच्या विश्लेषणानंतर ही स्थिती स्पष्ट झाली. यंदा जिल्ह्यात तुरीची सरासरी उत्पादकता गेल्या ५ वर्षांतील सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी आली आहे. १६ पैकी ११ तालुक्यांची उत्पादकता सरासरीपेक्षा कमी, तर ५ तालुक्यांची उत्पादकता सरासरीपेक्षा अधिक आल्याचे आढळले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

नांदेड जिल्ह्यात तुरीची उत्पादकता निश्चित करण्यासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे सर्व १६ तालुक्यांमध्ये २७६ पीककापणी प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाच्या निष्कर्षांच्या विश्लेषणानंतर जिल्ह्यातील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ९ किलो (एकरी २.०३ क्विंटल) आली असल्याचे आढळले आहे. 

२०१३ ते २०१७ या पाच वर्षांतील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ६.३३ क्विंटल आहे. यंदा जिल्ह्यात प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी आली आहे, परंतु अर्धापूर, माहूर, भोकर, बिलोली, कंधार या ५ तालुक्यांमधील उत्पादकता सरासरीच्या तुलनेत किमान ८ किलो ते कमाल २२.१३ क्विंटलने जास्त आली आहे.

मात्र अल्प तसेच लवकर उघडलेल्या पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसलेल्या जमिनीवरील तसेच कोरडवाहू क्षेत्रातील नांदेड, मुदखेड, हदगाव, किनवट, हिमायतनगर, उमरी, धर्माबाद, नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या ११ तालुक्यांतील तुरीची हेक्टरी उत्पादकता सरासरीपेक्षा १.०७ ते ५.३१ क्विंटलने कमी आली आहे. देगलूर तालुक्यात तूर उत्पादकतेत ५.३१ क्विंटलने घट झाली आहे. यंदा अर्धापूर तालुक्यातील तुरीची प्रतिहेक्टरी उत्पादकता सर्वाधिक २९.७० क्विंटल (एकरी ११.८८ क्विंटल), तर किनवट आणि उमरी तालुक्याची हेक्टरी उत्पादकता सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी १.६६ क्विंटल (एकरी ६६ किलो) आली आहे.

 

तालुकानिहाय प्रतिहेक्टरी तूर उत्पादकतेची तुलनात्मक स्थिती (क्विंटल)
तालुका  सरासरी उत्पादकता यंदाची उत्पादकता
नांदेड  ६.६८ ४.७२
अर्धापूर  ७.५७  २९.७०
मुदखेड ६.९४  ४.०१
हदगांव ५.८५  २.००
माहूर ७.३३  ८.१९
किनवट ६.१८ १.६६
हिमायतनगर ४.९३ ३.८६
भोकर ५.२७ ६.८२
उमरी  ५.१५ १.६६
धर्माबाद  ६.७१ २.४९
नायगाव ६.३८ ३.३७
बिलोली ७.९४ ८.०२
देगलूर ७.३१ २.००
मुखेड  ६.०२  १.५८
कंधार ३.७७ ११.५३
लोहा ७.१८ २.३७

 

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...