agriculture news in marathi, Tur purchase date extended by government | Agrowon

तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश अखेर निघाला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम कायम ठेवत केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेडअंतर्गत तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २३ एप्रिल रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आले. 

बाजारात तुरीचे दर घसरल्याने शासनाने नाफेडअंतर्गत तुरीच्या खरेदीस मंजुरी दिली. एफएक्‍यू दर्जाच्या तुरीची ५०४० या हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम कायम ठेवत केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेडअंतर्गत तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २३ एप्रिल रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आले. 

बाजारात तुरीचे दर घसरल्याने शासनाने नाफेडअंतर्गत तुरीच्या खरेदीस मंजुरी दिली. एफएक्‍यू दर्जाच्या तुरीची ५०४० या हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

एसएमएस गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी केंद्रावर न्यावा, असे अपेक्षित आहे. त्यानुसार राज्यात खरेदीला सुरवात झाली; परंतु काही केंद्रावर बारदाना तर काही केंद्रावर साठवणुकीची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदीच झाली नाही. त्यात १८ एप्रिलपर्यंतच खरेदीची मुदत असल्याने हजारावर शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीच होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत होता.

शेतकऱ्यांमधील हा असंतोष लक्षात घेत राज्य शासनाकडून तूर खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. ९ एप्रिल रोजी त्या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले होते. राज्य सरकारच्या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाने १५ मेपर्यंत तूर खरेदीस मुदतवाढ दिली आहे.

इतर बातम्या
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...