agriculture news in marathi, tur purchase limit increased in sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात तूर खरेदीची मर्यादा वाढविली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सांगली : बाजार समितीत तूर खरेंदी केंद्र सुरू झाले आहे. शासनाच्या नियमानुसार केवळ हेक्‍टरी ३.५० क्विंटल तूर खरेदी केली जात होती. मात्र, तुरीची उत्पादकता पाहून हेक्‍टरी साडेतीन क्विंटलऐवजी पाच क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ६०० तूर उत्पाकद शेतकऱ्यांनी आजअखेर नोंदणी केली आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंगच्या सूत्रांनी दिली.

सांगली : बाजार समितीत तूर खरेंदी केंद्र सुरू झाले आहे. शासनाच्या नियमानुसार केवळ हेक्‍टरी ३.५० क्विंटल तूर खरेदी केली जात होती. मात्र, तुरीची उत्पादकता पाहून हेक्‍टरी साडेतीन क्विंटलऐवजी पाच क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ६०० तूर उत्पाकद शेतकऱ्यांनी आजअखेर नोंदणी केली आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंगच्या सूत्रांनी दिली.

नाफेडमार्फत सांगली मार्केट यार्डात सेंट्रल वेअर हाउस येथे हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू झाले आहे. तुरीची खरेदी शुक्रवारी (ता. २) सुरू झाली आहे. तुरीला क्विंटलला ५ हजार ४५० रुपये हमीभाव आहे. मात्र बाजारात ४ हजार १०० रुपये दर आहे. तुरीचे दर घसरल्याने खरेदी केंद्र सुरू झाले आहे. मंगळवार(ता. ६)अखेर सुमारे ६०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यामुळे जिल्ह्यातील जत, आटपाडी तालुक्‍यांसह अन्य भागांतील शेतकऱ्यांनी हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी आले.

शासनाच्या नियमानुसार केवळ हेक्‍टरी साडेतीन क्विंटलची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त झाली. तूर खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना परत जावे लागते. मात्र पीक कापणी प्रयोग अहवालानुसार सांगली जिल्ह्यात हेक्‍टरी ३.५० क्विंटल तूर खरेदी करण्याबाबत शासनाचे पत्र आले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना साडेतीन क्विंटलवरील तूर परत न्यावी लागली होती. खरेदी केंद्राच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. जत तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांची साडेतीन क्विंटलवरील तूर खरेदी केली नाही. जादाची २२ क्विंटल तूर घेऊन टेंपो परत असताना त्यांना लगेचच परत बोलावून तूर खरेदी केली. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून हेक्‍टरी ५ क्विंटलने खरेदीचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

जत तालुक्‍यात खरेदी केंद्र सुरू करा
जत तालुक्‍यातून एक शेतकरी २२ पोती तूर घेऊन सांगली येथे तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी येतोय. त्यासाठी गाडी भाडे, वेळ आणि श्रम वाया जात आहेत. यामुळे जत येथील बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू केले, तर शेतकऱ्यांना वेळेत तूर विक्री करण्यास मदत होईल. यासाठी जत बाजार समितीत तूर खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.

हमीभावाने तूर खरेदीसाठी सहाशेहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. दररोज वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर आणण्याचे मेसेज दिले जात आहेत. तूर खरेदी केंद्रावर आणताना स्वच्छ व वाळवून आणावी.
- आर. एन. दानोळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सांगली.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...