तुरीला हमीभावही मिळेना

तुरीची चार हजारांच्या अात खरेदी केली जात अाहे. यामुळे शासनाने तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करायला हवी. बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून सध्या हमीभावापेक्षा कमी दराने होत असलेल्या खरेदीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे अाहे. एक तर त्यांनी भाव वाढवावेत. ते शक्य नसेल तर बाजार समितीत विकलेल्या तुरीला मिळालेला भाव व हमीभाव यातील तफावत शासनाने दिली पाहिजे. - डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज
तूर खरेदी
तूर खरेदी

अकोला ः सध्या तुरीचा हंगाम सुरू झाला असून बाजारपेठांमध्ये नवीन तुरीची अावक सुरू झाली अाहे. सध्या कुठल्याच बाजारात तुरीला केंद्राने जाहीर केलेल्या ५४५० इतका हमीभावसुद्धा मिळताना दिसत नाही. हमीभावापेक्षा सातशे रुपयांपेक्षा अधिक दर पडले आहेत. केंद्राने केवळ नोंदणीचे अादेश यंत्रणांना दिलेले असून खरेदीबाबत अद्याप कुठलेच निर्देश अालेले नाहीत. या महिन्यात अादेश येतील, असे अपेक्षित अाहे. केंद्राने या हंगामात तुरीला ५२५० रुपये दर व २०० रुपये बोनस असा मिळून ५४५० रुपये हमीभाव जाहीर केलेला अाहे. बाजारपेठांचा अाढावा घेतला असता तुरीला कुठेच हमीभाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर अाली. राज्यात तुरीचे सुमारे १२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असून त्यापैकी ३० टक्के म्हणजे ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र अमरावती विभागाचे अाहे. तर वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर या मोसमात लागवड झालेली अाहे. तुरीची काढणी सध्या सुरू झाली. येत्या १५ दिवसात हा हंगाम अाणखी वेगाने होणार अाहे. जसजशी काढणी होत अाहे तसतशी नवीन तूर विक्रीसाठी बाजारात दाखल होऊ लागली अाहे. मात्र गेले वर्षभर इतर शेतमालाबाबत अालेला कटू अनुभव तुरीच्या पिकालाही लागू झाला. विदर्भात तुरीची एक मोठी बाजारपेठ असलेल्या अकोला बाजारात शनिवारी (ता. ६) ३७२५ ते ४४५० दरम्यान भाव मिळाला. सरासरी ४१०० रुपये दर होता. म्हणजेच हमीभावापेक्षा ९०० रुपये कमीने तूर विकली गेली. ९०० क्विंटलपेक्षा अधिक अावक होती. वाशीममध्ये तूर ३९०० ते ४५०० दरम्यान विकली. या ठिकाणी नवीन तुरीची अावक दररोज वाढते अाहे. १५०० क्विंटलची शुक्रवारी खरेदी-विक्री झाली.   नोंदणीचे अादेश; खरेदी गुलदस्तातच या हंगामासाठी केंद्राने तुरीला ५४५० रुपये दर जाहीर केले. खरेदी प्रक्रियेपूर्वी नोंदणीचे अादेश देण्यात अालेले असून शेतकऱ्यांना अाॅनलाइन नोंदणी करावी लागते अाहे. तूर खरेदीबाबत अद्याप केंद्राकडून कुठलेच निर्देश अालेले नाहीत. त्यामुळे खरेदी यंत्रणासुद्धा कोण व कुठे केंद्र असतील याची माहिती स्पष्ट झालेली नाही.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com