agriculture news in Marathi, tur purchasing stuck in online registration in State, Maharashtra | Agrowon

तूर खरेदी अडकली नोंदणीतच
हरी तुगावकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

हमीभावाने खरेदी केंद्र सुरू केले तर बाजारपेठेवर परिणाम होईल हे खरे आहे; पण शासनाच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीचा वाईट अनुभव माझ्या पाठीशी आहे. शासनाचे धोरण चांगले आहे; पण राबविणारे चुकीचे आहेत. 
- नंदकुमार चामले, शेतकरी, धनेगाव, ता. लातूर
 

लातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्र मात्र आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेतच अडकल्याचे चित्र आहे. हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने बाजारभाव पडलेले आहेत. हमीभावापेक्षा बाजारात सध्या सर्वसाधारण दर १३०० रुपयांनी कमी आहेत. तुरीची आवक कमी असतानाही ही परिस्थिती आहे. तुरीची आवक वाढल्यानंतर तर हे भाव आणखीनच कोसळण्याची शक्यता आहे. 

या वर्षी केंद्र शासनाने तुरीसाठी पाच हजार ४५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या आयात- निर्यात धोरणाचा किंचितसा परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसत आहे. त्यामुळे चार हजार रुपयांच्या वर तूर गेली; पण शासनाच्या एनसीडीईएक्सवर हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली गेली आहे. 

दीड ते दोन हजार रुपये हमीभावापेक्षा कमी दराने ही खरेदी केल्याने त्याचाही परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येत आहे. सट्टेबाजांनी यात हात धुऊन घेतल्याचे सांगितले जाते. एक महिन्यापासून तुरीची आवक सुरू झाली आहे. या एक महिन्यात फक्त एकच दिवस चार हजार सातशे रुपये भाव गेला. उर्वरित मात्र सरासरी चार हजार ते साडेचार हजार रुपयेच भाव राहिला आहे. लातूरसह अकोला, सोलापूर, जळगाव अशा महत्त्वाच्या बाजारपेठांत हाच भाव राहिला आहे. हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने तूर विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

बाजार तुटत असल्याने खरेदीदार या मानसिकतेतून बाहेर यायलाच तयार नाहीत. त्यामुळे तूरडाळीला उठावच नाही. मागणी नसल्याने त्याचा परिणामही आता बाजारपेठेवर दिसून येत आहे. तसेच, शासनाने गेल्या वर्षी खरेदी केलेली ६५ लाख तूर विक्रीस काढली आहे. बाजारभावाप्रमाणेच त्याचा लिलाव होत आहे. शासनच हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची विक्री करीत असल्याचा परिणामदेखील बाजारपेठेवर होत आहे. तेलंगणने आतापर्यंत ३३ हजार ५०२ क्विंटल, तर कर्नाटकने १० हजार ५६९ टन तुरीची खरेदी केली आहे. कर्नाटक राज्य तर हमीभावाच्या वर राज्य शासनाचा बोनसही देऊन शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. 

आवक कमी तरीही...
गत वर्षी डिसेंबरमध्ये तुरीची हमीभावाने खरेदी करणारे महाराष्ट्र मात्र सध्या जाहिरातबाजीतच मश्गुल आहे. आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेतच शासन अडकले आहे. हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू झाली तरच बाजारपेठेतील भावातही वाढ होण्याची शक्यता आहे. लातूरसारख्या बाजारपेठेत सात-आठ हजार क्विंटलची आवक आहे. आवक कमी असताना भाव वाढत नाहीत. आवक वाढल्यानंतर तर आणखी भाव कोसळण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया
सध्या आयात कमी असतानासुद्धा तुरीचा भाव पडलेला आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू केले तर हा भाव वाढण्यास मदत होणार आहे. यासोबतच कुपोषणमुक्तीसाठी प्रथिने गरजेची आहेत, ती डाळीतून मिळतात. याचा प्रचारही करण्याची गरज आहे. 
- हुकूमचंद कलंत्री, तुरीचे व्यापारी

इतर अॅग्रो विशेष
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक...मुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन...
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेतपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक...औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक...
‘डिमोशन’ रोखण्यासाठी अनेकांची पळापळ;...अकोला ः राज्याच्या कुठल्याही विभागात नसेल असा...
देशात खरीप पेरणीला प्रारंभनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या...
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर,...पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची...
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीजळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या...
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित;...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने...
शेतीतील नव तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा...अकोला :  भारतीय शेतकरी जागतिक बाजारात...
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...