अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४०० रुपये

अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४०० रुपये
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४०० रुपये

अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २३) तुरीची १२३६ क्विंटल आवक झाली होती. तुरीला कमीत कमी ४२०० व जास्तीत जास्त ५४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ५३५० रुपये दर होता, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. 

बाजार समितीत हरभऱ्याची आवक स्थिरावलेली आहे. १२२७ क्विंटलची आवक झाली होती. हरभऱ्याचा दर ३७०० ते ४३०० दरम्यान होता. सरासरी ४२०० रुपये भाव मिळाला. सोयाबीनची आवक या बाजार समितीत सातत्याने हजार क्विंटलपेक्षा अधिक होत आहे. सोयाबीनचा दर ३३५० ते ३६५० रुपये असा होता. सरासरी ३६०० रुपये दर मिळाला. ११५६ क्विंटलची आवक झाली होती.      

ज्वारीची २६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १८५० ते २०००, तर सरासरी १९०० रुपये असा दर होता. गव्हाची ७६९ क्विंटल आवक झाली. 

गव्हाला प्रतिक्विंटल १६५० ते २१००, तर सरासरी १७५० रुपये असा दर मिळाला. शरबती गव्हाची १४७ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २१५० ते ३४००, तर सरासरी २५५० रुपये असा दर होता. उडदाचा दर ४००० ते ४८०० असा होता. सरासरी ४६०० रुपये दर मिळाला. ९२ क्विंटल आवक झाली होती.

मुगाची ३० क्विंटल आवक व ४६०० ते ६००० दरम्यान दर मिळाला. ५१०० रुपये सरासरी दर होता. पांढऱ्या हरभऱ्याची ८८ क्विंटलची आवक झाली. ४७०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

सरासरी ४९०० रुपये दर होता. बरबटीची २५ क्विंटल आवक झाली. बरबटीला २००० ते ३००० दरम्यान दर होता. सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. मोहरीची ३ क्विंटल आवक झाली. ३५०० ते ३६५० या दरम्यान विक्री झाली. सरासरी ३५७५ रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com