agriculture news in marathi, tur rate downs as procurement stops | Agrowon

हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले कमी
विनोद इंगोले
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर कमी झाल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. गेल्या आठवड्यात कळमणा बाजार समितीत ३७०० ते ४१३२ रुपये क्‍विंटल असलेली तूर ३४०० ते ३९०० रुपये क्‍विंटलवर आली. आयातीच्या परिणामी तुरीचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला. 

नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर कमी झाल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. गेल्या आठवड्यात कळमणा बाजार समितीत ३७०० ते ४१३२ रुपये क्‍विंटल असलेली तूर ३४०० ते ३९०० रुपये क्‍विंटलवर आली. आयातीच्या परिणामी तुरीचे दर आणखी कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला. 

कळमणा बाजार समितीत गहू, हरभरा, ज्वारी, तुरीची आवक होत आहे. मोझांबिकवरून केंद्र सरकारने तूर आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच शासकीय हमीभाव खरेदीदेखील बंद करण्यात आली. त्याचा फटका बाजाराला बसत तुरीचे दर कोसळले. गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटलपर्यंत असलेली तूर ३९०० रुपयांपर्यंत खाली आली. तुरीची बाजारातील रोजची सरासरी आवक एक हजार क्‍विंटलच्या घरात आहे. बाजारात लुचई तांदूळाची आवक होत असून २२०० ते २५०० रुपये असे तांदूळाचे दर आहेत.

तांदूळाची रोजची आवक ९० ते १०० क्‍विंटलची आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पाच हजार क्‍विंटलपेक्षा रोजची आवक आहे. ३००० ते ३३६० रुपये क्‍विंटल असे हरभऱ्याचे दर आहेत. १८ तारखेला मूगाची अवघी ११ क्‍विंटल आवक झाली. ४३०० ते ४५०० रुपये क्‍विंटल असा मुगाचा दर होता. उडीदाचीदेखील आठवड्यात एकदाच आवक झाली. १८ मे रोजी २१ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. ३२०० ते ३५०० रुपये क्‍विंटलने उडीदाचे व्यवहार झाले. बाजारात सोयाबीनची आवक नियमित असून ४५० ते ५०० क्‍विंटल अशी आवक होते. ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलचा दर सोयाबीनला मिळत आहे.

नाशिक परिसरातून द्राक्षाची आवक होत आहे. सरासरी ४० क्‍विंटलची द्राक्षाची आवक असल्याचे सांगण्यात आले. ४००० ते ६००० रुपये क्‍विंटलचा दर द्राक्षाला असल्याचे सांगण्यात आले. डाळिंब गेल्या पंधरवाड्यापासून २००० ते ८००० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहे. डाळिंबाची सरासरी ६०० क्‍विंटलची आवक आहे. तोतापल्ली आंबादेखील बाजारात नियमित येत आहे. सरासरी ३५०० ते ४००० क्‍विंटल इतकी मोठी आंब्याची आवक आहे. गेल्या आठवड्यात १८०० ते २४०० रुपये क्‍विंटल तोतापल्ली आंब्याचे दर होते. त्यात घसरण होत ते या आठवड्यात १२०० ते २००० रुपयांवर पोचले आहेत. बटाट्याचे दर १६०० ते १८०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. २८०० ते ३००० क्‍विंटलची बटाट्याची रोजची आवक आहे. 

मोसंबीची आवक नियमित
हंगाम संपल्याच्या परिणामी संत्र्याची नसली तरी मोसंबीची आवक मात्र होत आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाची सरासरी ५० ते ६० क्‍विंटलची आवक आहे. गेल्या आठवड्यात सर्वाधिक १०० क्‍विंटल आवक झाली होती. त्यानंतर आवक कमी होत गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...