agriculture news in Marathi, tur rate reduced in Nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात तुरीच्या दरात घसरण
विनोद इंगोले
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या सुरवातीला वधारलेले तुरीचे दर खाली येण्यास सुरवात झाली आहे. आवक वाढल्याच्या परिणामी तुरीचे दरात घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ३६०० ते ४६०० रुपये प्रती क्‍विंटल असा तुरीचा दर होता, हा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांवर पोचला आहे. 

नागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या सुरवातीला वधारलेले तुरीचे दर खाली येण्यास सुरवात झाली आहे. आवक वाढल्याच्या परिणामी तुरीचे दरात घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ३६०० ते ४६०० रुपये प्रती क्‍विंटल असा तुरीचा दर होता, हा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांवर पोचला आहे. 

आठवड्याच्या सुरवातीला बाजारात तुरीची अवघी ६० ते ६५ क्‍विंटल अशी जेमतेम आवक होती. दरम्यान १९ जानेवारीपासून आवकेत वाढ होत ती २२८ क्‍विंटलवर पोचली. सद्यस्थितीत तुरीचे व्यवहार ३६०० ते ४१०० रुपये प्रती क्‍विंटलने होत आहेत. सुरवातीला हेच दर ४६०० रुपये प्रती क्‍विंटलवर गेले होते. शासनाने तूरीला ५४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाही.

शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काही अंशी सुधारणा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीनची आवक ७०० ते १००० क्‍विंटल अशी आहे. २८०० ते ३१०० रुपये प्रती क्‍विंटलचा दर सुरवातीला होता. त्यात सुधारणा होत हे दर ३३०० रुपये क्‍विंटलपर्यंत पोचले आहेत. 

मोठ्या आकाराचा संत्रा २००० ते २५०० रुपये क्‍विंटलवर स्थीर आहे. ६० क्‍विंटलपासून २०० क्‍विंटलपर्यंत संत्र्याची आवक बाजारात होत आहे. १७०० क्‍विंटल अशी मोसंबीची सरासरी आवक आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांना १६०० ते २००० रुपये प्रती क्‍विंटलचा दर मिळत आहे. डाळींबाचे दर १००० ते ५००० रुपये प्रती क्‍विंटल असे स्थिर आहेत. डाळिंबाची आवक ११०० ते १५०० क्‍विंटल अशी दररोजची आहे.

बाजारात बटाट्याची आवकदेखील ५५०० ते ९००० क्‍विंटलची आहे. बटाट्याचे बाजारात दर सरासरी ४०० ते ८०० रुपये प्रती क्‍विंटल असे गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत. २००० ते ३५०० रुपये प्रती क्‍विंटल असा लाल कांद्याचा तर १८०० ते २५०० रुपये प्रती क्‍विंटल असा पांढऱ्या कांद्याचा दर आहे. कांदा आवक  दररोजची सरासरी २००० क्‍विंटलची आहे. 

आठवडयाच्या सुरवातीला ७०० ते १००० रुपये प्रती क्‍विंटल असलेल्या टोमॅटोच्या दरात चांगलीच घसरण नोंदविण्यात आली. टोमॅटो दर २० जानेवारीला ४०० ते ६०० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले होते. या दरात काही अंशी सुधारणा होण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. टोमॅटोची सरासरी आवक १०० ते १५० क्‍विंटल अशी आहे. २००० ते २५०० रुपये प्रती क्‍विंटल चवळी शेंग होती. या शेंगाचे दर वधारत २५०० ते ३००० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले आहेत. १७ जानेवारी रोजी ३५०० रुपये प्रती क्‍विंटलचा दरही चवळी शेंगांना मिळाला.

भेंडी २५०० ते ३००० रुपये प्रती क्‍विंटलवर आठवडाभरापासून स्थिर आहे. १०० ते १२० क्‍विंटल अशी भेंडीची सरासरी आवक आहे. ढोबळ्या मिरचीची आवक बाजारात १७० क्‍विंटलची आहे. १४०० ते १६०० रुपये प्रती क्‍विंटलचा दर या मिरचीला मिळत आहे. फुलकोबी सुरवातीला १२०० ते १८०० रुपये प्रती क्‍विंटल होती. त्यात घसरण होत हे दर ५०० ते ८०० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले आहेत. २७० क्‍विंटलची कोबीची आवक आहे.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...