agriculture news in marathi, Tur repurchase date extended will not benefit farmers? | Agrowon

तूर खरेदीची मुदतवाढ औटघटकेची ठरण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

अकोला : तुरीच्या मोजमापासाठी केंद्राने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असली, तरी हा आनंद औटघटकेचा ठरण्याचीच शक्‍यता अधिक आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के तुरीचे मोजमाप झालेले असून, ६५ टक्‍क्‍यांवर तूर पडून आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, आपला नंबर कधी लागतो याकडे लक्ष लागलेले आहे.

अकोला : तुरीच्या मोजमापासाठी केंद्राने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असली, तरी हा आनंद औटघटकेचा ठरण्याचीच शक्‍यता अधिक आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के तुरीचे मोजमाप झालेले असून, ६५ टक्‍क्‍यांवर तूर पडून आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, आपला नंबर कधी लागतो याकडे लक्ष लागलेले आहे.

तूर खरेदीची मुदतवाढ जाहीर झाली तरी अद्याप खरेदीने कुठेही वेग घेतलेला नाही. कदाचित बुधवार (ता. दोन)पासून ही खरेदी सुरळीत व वेगाने होईल, असे अधिकारी सांगतात. अनेक ठिकाणी खरेदी होणाऱ्या तुरीच्या साठवणुकीसाठीच्या जागेचा पेच सोडवता आलेला नाही. जागाच नसेल तर खरेदी केलेली तूर ठेवायची कुठे, यामुळे मोजमाप न करून घेणे हाच उपाय केला जात आहे. 

अकोला जिल्ह्यात या वर्षी ४० हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी केवळ ३० ते ३५ टक्‍क्‍यांपर्यंतच शेतकऱ्यांची मोजणी गेल्या दोन महिन्यांत झाली. म्हणजेच अद्याप ६५ टक्के शेतकऱ्यांची तूर घ्यायची आहे. बुलडाण्यातही ४५ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तेथील मोजमापाचीसुद्धा अशीच अवस्था आहे. वाशीम जिल्ह्यातील तूर खरेदी तर सातत्याने बंद-सुरूच्या फेऱ्यात अडकलेली होती. 

आतापर्यंत पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी झाली आहे. उर्वरित तुरीचा विचार केला तर किमान एवढीच तूर शिल्लक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  खरेदी बेभरवशाची असल्याचे चित्र बनल्याने अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात नेऊन विक्री सुरू केली आहे. यातून शेतकऱ्यांना क्विंटलमागे किमान दीड हजाराचे नुकसान झेलावे लागत आहे. सध्या ३६०० ते ३९०० पर्यंत तूर विक्री होत आहे. आता तूर खरेदीची १५ दिवस मुदतवाढ मिळालेली असली, तरी त्यात दोन रविवारच्या सुट्या गृहीत धरल्या तर खरेदीला १३ दिवस मिळतात. यापैकी किती दिवस व किती ठिकाणी खरेदी सुरळीत होईल, याचे उत्तर यंत्रणांकडे नाही. चुकाऱ्यांचेही प्रश्‍न सध्या गंभीर आहेत. शासकीय गोदामे महिनाभरापूर्वीच तुडुंब झालेली असल्याने खासगी ठिकाणी साठवणुकीचा प्रश्‍न सोडविला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...