agriculture news in marathi, Tur repurchase may start in Maharashtra again | Agrowon

राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयास १५ जूनपर्यंत मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात अद्यापही उद्दिष्टाच्या ३१ टक्के तूर खरेदी बाकी आहे, तर हजारो क्विंटल शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे. 

नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयास १५ जूनपर्यंत मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. राज्यात अद्यापही उद्दिष्टाच्या ३१ टक्के तूर खरेदी बाकी आहे, तर हजारो क्विंटल शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे. 

या प्रश्‍नी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह, कृषिराज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कृषी सचिव शोभना पटनाईक, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चढ्ढा यांची गुरुवारी (ता. २४) भेट घेतली. राज्यातील गोदामे अाणि बारदाण्याच्या कमरतेमुळे तूर खरेदीस विलंब होत असल्याने मुदतीत उद्दिष्टपूर्ती झाली नसून १६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात अाली.

महाराष्ट्रात ११५ लाख क्विंटल तूर उत्पादन होण्याचा यंदा अंदाज आहे. यापैकी ४४.६ लाख क्विंटल (३८.७ टक्के) तूर हमीभावाने खरेदी करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले होते. १५ मे रोजी तूर खरेदीची मुदत संपल्यानंतर सरकारने उद्दिष्टाच्या केवळ ६९.७ टक्के तूर खरेदी केली आहे. उर्वरित नोंदणीकृत तूर खरेदी व्हावी याकरिता राज्य सरकारने पुन्हा केंद्राकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. 
तूर खरेदीच्या स्वत:च्याच उद्दिष्टातही मागे असलेल्या राज्य सरकारच्या तूर खरेदीत अनेक कारणांनी शेतकऱ्यांच्या राेषास पात्र ठरली. यात नोंदणीतील अनागोंदी, गोदामांची अपूर्ण संख्या, कमी बारदाणा, थकलेले पेमेंट आदी कारणांनी शेतकऱ्यांत असंतोष आहे. आजही राज्यात तूर खरेदीसंदर्भात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...