agriculture news in marathi, tur storage issue, beed, maharashtra | Agrowon

बीड जिल्ह्यात तूर, हरभरा साठवायला जागा मिळेना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018
बीड  : जिल्ह्यात हमीभावाने खरेदी केलेला १ लाख ३७ हजार क्‍विंटल तूर व हरभरा साठविण्यासाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे खरेदी केलेला शेतीमाल केंद्रावरच पडून असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 
 
बीड  : जिल्ह्यात हमीभावाने खरेदी केलेला १ लाख ३७ हजार क्‍विंटल तूर व हरभरा साठविण्यासाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे खरेदी केलेला शेतीमाल केंद्रावरच पडून असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 
 
बाजारात दर पडल्याने शासनाने हस्तक्षेप करून बीड जिल्ह्यात तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी पंधरा केंद्रे सुरू केली. या केंद्रांवरून २ मेपर्यंत १८ हजार ८०० शेतकऱ्यांकडून सुमारे १ लाख ८९ हजार ६४२ क्‍विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आली. या तुरीपैकी केवळ ८६ हजार २६ क्‍विंटल तुरीलाच गोदामात साठविण्यासाठी जागा मिळाली. उर्वरित १ लाख ३ हजार ६१६ क्‍विंटल तूर साठविण्यासाठी जागाच न मिळाल्याने खरेदी केंद्रावर पडून होती.
 
गोदामात साठविल्या गेलेल्या तुरीची पावती वरिष्ठ पातळीवर पोचत असल्याने तेवढ्याच तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. आता जसजशी जागा रिकामी होईल तसतशी गोदामांमध्ये तूर साठवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
तुरीबरोबरच मार्चच्या सुरवातीच्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली. यापैकी जवळपास सात केंद्रांवर हरभऱ्याची आवक झाल्याचे आकडे सांगतात. या सातही केंद्रांवरून ३१०८ शेतकऱ्यांकडून २ मेपर्यंत ४१ हजार २१६ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी ७ हजार २६९ क्‍विंटल हरभरा साठविण्यासाठी जागा मिळाली. अजूनही ३३ हजार ९४७ क्‍विंटल हरभरा साठविण्यासाठी जागा मिळाली नाही.
 
त्यामुळे तुरीसोबतच हरभऱ्याचीही ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या खरेदीतील शेतकऱ्यांना तातडीने अपेक्षित असलेल्या चुकाऱ्याचा प्रश्‍न कायम आहे. लग्नसराईत शेतीमालाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...