agriculture news in marathi, Tur, turf Tired of farmers due to tiredness | Agrowon

बुलडाण्यात तूर, हरभऱ्याचे चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 जुलै 2018

बुलडाणा : शासनाने हमीभावाने खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याचे सुमारे ४४ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे चुकारे थकलेले असून शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी सर्वत्र होत अाहे. तूर अाणि हरभरा उत्पादकांच्या रखडलेल्या चुकाऱ्यांची रक्कम नाफेडच्या वतीने देण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा दिलासाच केवळ अधिकाऱ्यांकडून मिळत अाहे.

बुलडाणा : शासनाने हमीभावाने खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याचे सुमारे ४४ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे चुकारे थकलेले असून शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी सर्वत्र होत अाहे. तूर अाणि हरभरा उत्पादकांच्या रखडलेल्या चुकाऱ्यांची रक्कम नाफेडच्या वतीने देण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा दिलासाच केवळ अधिकाऱ्यांकडून मिळत अाहे.

या हंगामात अाॅनलाईन नोंदणी झालेली तूर व हरभऱ्याची सरासरी २५ टक्केही खरेदी शासनाकडून झालेली नाही. ठेवायला जागा, बारदाना नसणे अादी कारणाने अत्यंत संथगतीने ही मोजणी प्रक्रिया राबवल्याने ७५ टक्के शेतकरी अापला माल हमीभावाने विकू शकलेले नाहीत. असे असताना ज्यांनी शासनाला तूर व हरभरा विकला त्यांचेही पैसे मिळायला मोठा विलंब होत अाहे. जिल्ह्यात अद्यापही सुमारे ४४ कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा करायची शिल्लक अाहे. याबाबत ठोस कारवाई होण्याची मागणी शेतकरी करीत अाहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत हे रखडलेले चुकारे तातडीने देण्याबाबत निवेदन दिले. शासनाने दखल न घेतल्यास अांदोलनाचा इशारा दिला अाहे.      

हजार रुपयांची मदतही रखडलेलीच
अाॅनलाईन नोंदणी करणाऱ्या व मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांच्या तूर व हरभऱ्याला प्रतीक्विंटल एक रुपये अार्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले अाहे. ही मदत मिळण्यासाठी मोठ्या कसरती सुरू झाल्या अाहेत. नोंदणी केली पण मोजमाप झाले नाही, अशा शेतकऱ्यांची यादी खरेदी विक्री संघामार्फत तहसीलदारांकडे पाठविण्यात अाली आहे. या याद्या पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तपासणी केल्या जात अाहेत. एक हेक्टर क्षेत्र व दहा क्विंटल मर्यादेत शासन मदत करणार असल्याचे सांगितले जात अाहे. दोनवर्षांपूर्वी सोयाबीन अनुदानाबाबत शासनाकडून अशीच याद्यांची छानणी करण्यात अाली होती. तोच कित्ता पुन्हा तूर व हरभरा उत्पादकांना मदत देण्यासाठी गिरवला जात अाहे.

इतर ताज्या घडामोडी
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल...वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत...
पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्‍टरवर...पुणे   ः जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात...
सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग...सातारा   ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून...