agriculture news in marathi, turbulence in annual meeting of gokul, kolhapur, maharashtra | Agrowon

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत रविवारी (ता. ३०) प्रचंड गोंधळ झाला. केवळ तीन मिनिटांत मंजूर, नामंजूर अशा घोषणांच्या गदारोळात सभा आटोपती घेण्यात आली.

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत रविवारी (ता. ३०) प्रचंड गोंधळ झाला. केवळ तीन मिनिटांत मंजूर, नामंजूर अशा घोषणांच्या गदारोळात सभा आटोपती घेण्यात आली.

सभा सुरू असताना सत्ताधारी व विरोधकांत चप्पलफेक झाली. भेट म्हणून दिलेले खाद्यान्न, दुधाच्या पॅकिंग पिशव्या एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आल्या. कार्यालयाच्या बाहेरून व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक झाली. या हिंसक घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर पोलिसांनी सभासदांना पांगविले. ज्या मल्टिस्टेट ठरावावरून सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते, त्या ठरावासह अन्य ठराव मंजूर झाल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला, तर दोन हजारांहून अधिक सभासद बाहेर असल्याचे कारण देत हा ठराव नामंजूर झाल्याचा आरोप विरोधी गटाने समांतर सभेत केला.

गेल्या काही दिवसांपासून दूध संघ मल्टिस्टेट करण्याबाबत माजी आमदार महादेव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने ठराव केला होता. याला पी. एन. पाटील यांनीही समर्थन दिले होते. हा ठराव सभेत मंजूर करण्यात येणार होता. आमदार सतेज पाटील यांच्या विरोधी गटाने याला विरोध केला होता. गेल्या पंधरा दिवसांत गावोगावी सभा घेऊन याबाबत दोन्ही गटांकडून वातावरण तापविण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्‍वभूमीवर रविवारच्या सभेला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. येथील ताराबाई पार्काच्या कार्यालयात सकाळपासून तणावाचे वातावरण होते. सभा अकराला असली तरी साडेसहा वाजल्यापासूनच सभास्थळी सभासदांना प्रवेश देण्यात येत होता. आठ वाजताच सभास्थळ पूर्ण भरले.

दरम्यान दहा वाजण्याच्या सुमारास विरोधी सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी वॉटरपार्कजवळून एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. तेथून आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चाच्या स्वरूपात सभेच्या ठिकाणी आले. बसण्यास पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांनी निषेध करीत सभेच्या ठिकाणाबाहेरच ठाण मांडले.

अकरा वाजता सभेला सुरवात झाली. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी ठरावाचे सविस्तर वाचन न करता केवळ ठरावांची संख्या सांगत सर्व ठराव मंजुरीसाठी ठेवल्यानंतर व्यासपीठासमोर मंजूर, नामंजूरचा गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ सुरू झाल्याचे लक्षात येताच अवघ्या तीन मिनिटांतच राष्ट्रगीताला सुरवात करून सभा गुंडाळण्यात आली. संतप्त विरोधी सभासदांनी व्यासपीठाच्या दिशेने चपलांची फेकाफेक केली. यामुळे वातावरण गंभीर झाले.

विरोधकांनी या सभेचा निषेध करीत बाहेर येऊन समांतर सभा घेऊन निषेध केला. सभेनंतर महादेव महाडिक यांनी व्यासपीठावर येत ही सभा लोकशाही पद्धतीने झाल्याचे सांगत सर्व ठराव मंजूर केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले. या वेळी पुन्हा गोंधळ झाला.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...