agriculture news in marathi, Ture, grain storage serious problem | Agrowon

हमीभावाच्या तूर, हरभरा साठवणुकीचा प्रश्न गंभीर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात हमीभावाच्या तूर व हरभरा खरेदीचे भिजत घोंगडे कायम आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या ६३ हजारांवर शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी बाकीच असल्याचे चित्र लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत आहे. दुसरीकडे जवळपास अडीच लाख क्‍विंटल तूर व हरभरा साठविण्याला बीडमध्ये जागाच मिळत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तो माल खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : मराठवाड्यात हमीभावाच्या तूर व हरभरा खरेदीचे भिजत घोंगडे कायम आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या ६३ हजारांवर शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी बाकीच असल्याचे चित्र लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत आहे. दुसरीकडे जवळपास अडीच लाख क्‍विंटल तूर व हरभरा साठविण्याला बीडमध्ये जागाच मिळत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तो माल खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकवेळ मुदतवाढ मिळाल्यानंतरही तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मराठवाड्यात जास्त आहे. याला हमीभावाच्या खरेदीसाठीची व्यवस्था व पायाभूत सुविधांचा अभाव ही दोनच कारणे असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतो आहे.

तुरीच्या हमीभावाने खरेदीला एकवेळ मुदतवाढ दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदीच केल्या गेली नसताना हमीभावाने खरेदीची वाढीव मुदत संपली. वाढीव मुदतीत बारदान्याने खोडा घालण्याचे काम केले. त्यातच सुरू करण्यात आलेल्या हरभरा खरेदीला बारदाना तुटवड्याने लातूरात ग्रहण लावले, तर इतरत्र जागा उपलब्ध नसल्याचा परिणाम खरेदीची गती मंदावण्यावर झाल्याचे पाहायला मिळाले.

ऑनलाइन नोंदणीचा शासनाने गाजावाजा केला. परंतु ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची ना तूर खरेदी केली गेली ना हरभरा. एकट्या लातूर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ४७ हजारांवर शेतकऱ्यांपैकी केवळ सात हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला गेला. जवळपास ४० हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही त्यांचा हरभरा खरेदी केला गेला नाही.

बीड जिल्ह्यात ही संख्या २० हजारांवर असून, जालना जिल्ह्यात जवळपास ३५०० शेतकऱ्यांची हरभरा खरेदीसाठीची ऑनलाइन नोंदणी ऑनलाइनपुरतीच मर्यादित राहिली आहे. बीड जिल्ह्यात हमीदराने खरेदी केलेला शेतीमाल साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गोडावूनच शिल्लक नसल्याने व जे उपलब्ध होताहेत ते दुरुस्ती केल्याशिवाय त्यामध्ये माल साठविता येत नसल्याने बीडमध्ये खरेदी केलेला माल साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हमीभाव असतानाही बाजारात कमी दराने खरेदी
शासनाच्या हमी दराने खरेदीला सुरवात केल्यानंतर बाजारातील दर वाढणे अपेक्षित असते. मात्र, तसे होताना दिसले नाही. त्यामुळे हस्तेक्षेपानंतरही पडलेलेच राहणारे दर शासनासाठी चिंतेचा विषय आहे. लातूर व बीड या दोन्ही जिल्ह्यांत हमीदराच्या तुलनेत बाजारातील दरात एक ते दीड हजाराची तफावत कायम आहे. लातुरात हरभरा तीन हजार ते एकतीसशे रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केला जात असतानाच तुरीची खरेदी ४२०० ते ४३०० रुपये प्रतिक्‍विंटलपुढे सरकली नाही. बीडमध्येही यापेक्षा फारसे काही वेगळे चित्र नाही.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...