agriculture news in marathi, tureric cultivation | Agrowon

तयारी हळद लागवडीची...
डॉ. मनोज माळी, डॉ. भरत पाटील
गुरुवार, 19 एप्रिल 2018

हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
 
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानात हळदीची उगवण चांगली होते. मे ते जून महिन्यातील उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल असते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते.

हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
 
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानात हळदीची उगवण चांगली होते. मे ते जून महिन्यातील उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल असते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते.

 • मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
 • नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत हळदीचे चांगले उत्पादन मिळते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीची खोली सर्वसाधारणपणे २० ते २५ सें.मी. असावी.
 • भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्त जमिनी या पिकास मानवत नाहीत. अशा जमिनीमध्ये पिकाची पाल्याची वाढ जास्त होते. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात कंद पोसत नाहीत. परिणामी उत्पादन कमी मिळते.
 • लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे, त्यामुळे खतांचे नियोजन करणे सोपे होते.
 • ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते. परंतु जमिनीत वाढणारे कंद कमी पोसतात. त्यांचा आकार अतिशय लहान राहतो. म्हणून हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षण अहवालानुसार योग्य त्या प्रमाणात खते देणे सोयीचे होते. परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
 • जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. पहिले पीक काढल्यानंतर जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने १८ ते २२ सें.मी.पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी १ ते २ महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून नांगरट करावी. शेतात शेणखत पसरून घ्यावे.

सुधारीत जाती ः
फुले स्वरूपा ः

 • दुग्गीराला या दक्षिण भारतातील जातीमधून निवड पद्धतीने ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात मध्यम उंच वाढणारी आहे.
 • सरळ वाढीची सवय, पानांचा रंग हिरवा असून, पानांची संख्या अकरा ते तेरा असते.
 • पक्वतेचा काळ २५५ दिवसांचा असून, फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते.
 • गड्डे मध्यम आकाराचे असून, वजनाने ५० ते ५५ ग्रॅमपर्यंत असतात. हळकुंड वजनाने ३५ ते ४० ग्रॅम असून, प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यानंतर त्यावर उप-हळकुंडांची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते.
 • हळकुंडे सरळ व लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग पिवळसर असून, कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के इतके आहे.
 • पानांवरील करपा रोग तसेच कंदमाशीस प्रतिकारक.
 • ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी ३५८.३० क्विंटल, वाळलेल्या हळदीचे ७८.८२ क्विंटल उत्पादन. उतारा २२ टक्के इतका आहे.

सेलम ः

 • सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस.
 • पाने रुंद, हिरवी असून, झाडास १२ ते १५ पाने येतात. वातावरणात आर्द्रता असल्यास या जातीच्या झाडांना फुले क्वचित येतात. या जातीच्या झाडांची उंची कडप्पा जातीपेक्षा थोडी कमी असते.
 • हळकुंडे, उप-हळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडांची साल पातळ असून, गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो. कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के इतके आहे.
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 • ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. ही हळद परिपक्व होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात.

राजापुरी ः

 • सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लागवड.
 • पाने आकाराने रुंद, रंगाने फिक्कट हिरवट व सपाट असतात. एका झाडास १० ते १५ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात.
 • हळकुंडे व उप-हळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून, गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. कुरकुमीनचे प्रमाण ६.३० टक्के इतके आहे.
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 • ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी २५० ते ३०० क्विंटल, वाळलेल्या हळदीचे ५० ते ६० क्विंटल उत्पादन. उतारा १८ ते २० टक्के.

कृष्णा ः

 • ही जात हळद संशोधन केंद्राने कडप्पा या जातीमधून निवड पद्धतीने विकसित केली आहे.
 • पाने आकाराने रुंद, रंगाने हिरवट व सपाट असतात. एका झाडास १० ते १२ पाने येतात.
 • हळकुंडे लाब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडांचा गाभा पांढरट पिवळा असतो. हळकुंडाच्या दोन पेरांमधील अंतर इतर जातींच्या तुलनेने जास्त असते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात.
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 • कुरकुमीनचे प्रमाण २.८० टक्के इतके आहे. वाळलेल्या हळदीचे हेक्‍टरी ७५ ते ८० क्विंटल उत्पादन.

टेकुरपेटा ः

 • पारंपरिक जात, हळदीच्या इतर जातींपेक्षा उत्पादनात सरस.
 • हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. मात्र हळकुंडांचा गाभा आणि पानांचा रंग फिकट पिवळा असतो. पाने रुंद व सपाट असतात. एका झाडास १० ते १२ पाने येतात.
 • कुरकुमीनचे प्रमाण १.८० टक्के. कच्च्या हळदीचे हेक्टरी ३८० ते ४०० क्विंटल व वाळलेल्या हळदीचे ६५ ते ७० क्विंटल उत्पादन.

वायगाव ः

 • ही जात चंद्रपूर जिल्ह्यातील असून, ७ ते ७.५ महिन्यात पक्व होते.
 • ९० टक्के झाडांना फुले येतात. पानांचा रंग गर्द हिरवा व चकाकणारा असतो. ८ ते १० पाने येतात. पानांना तीव्र सुवास असतो. हळद पावडरची चवही वेगळी येते.
 • कुरकुमीनचे प्रमाण ६.० ते ७ टक्के. या जातीचा उतारा २० ते २२ टक्के असतो.
 • हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा असतो.
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 • कच्च्या हळदीचे उत्पादन १७५ ते २०० क्विंटल व वाळलेल्या हळकुंडांचे उत्पादन ३८ ते ४५ क्विंटल.

आंबे हळद ः

 • हळदीला कच्च्या आंब्यासारखा सुवास असतो. ही हळद दिसायला इतर जातींप्रमाणेच असते. परंतु आतील रंग एकदम फिक्कट पिवळा पांढरट असतो.
 •  हळद हळव्या प्रकारात मोडते. ७ ते ७.५ महिन्यात काढणीस तयार होते.
 • लोणच्यासाठी या हळदीस मागणी.

लागवड तंत्र ः
सरी - वरंबा पद्धत ः

 • पाटपाण्याने पाणी द्यावयाचे असल्यास लागवड सरी-वरंबा पद्धतीने करावी.
 • या पद्धतीत ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सरी पाडून घ्याव्यात.
 • सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत मिसळावे.
 • जमिनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी जमिनीचा उतार घेऊन ५ ते ६ मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.

रुंद वरंबा पद्धत ः

 • ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.
 • रुंद वरंबा तयार करताना १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून ६० ते ७५ सें.मी. माथा असलेले २० ते ३० सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी-रुंदीचे गादीवाफे पाडावेत.
 • वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा. त्यानंतर ३० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
 • एका गादी वाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते.

संपर्क ः डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४
(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...