agriculture news in marathi, Turi sale picks up; Farmers suffer | Agrowon

तूर विक्रीचे चुकारे मिळेनात; शेतकरी त्रस्त
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

जळगाव : नाफेडच्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशनने सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्रांवर तुरीची विक्री केलेल्या सुमारे १० टक्के शेतकऱ्यांना दोन महिने उलटूनही चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करताना घेतलेल्या बॅंक खाते व आधार, पॅन क्रमांक संबंधित चुका कर्मचाऱ्यांनी करून ठेवल्याने अनेक जण चुकाऱ्यांपासून वंचित आहेत. या चुका तूर विक्रीसंबंधी सब एजंट म्हणून काम केलेल्या शेतकी संघांच्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

जळगाव : नाफेडच्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशनने सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्रांवर तुरीची विक्री केलेल्या सुमारे १० टक्के शेतकऱ्यांना दोन महिने उलटूनही चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करताना घेतलेल्या बॅंक खाते व आधार, पॅन क्रमांक संबंधित चुका कर्मचाऱ्यांनी करून ठेवल्याने अनेक जण चुकाऱ्यांपासून वंचित आहेत. या चुका तूर विक्रीसंबंधी सब एजंट म्हणून काम केलेल्या शेतकी संघांच्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

शेतकी संघात विचारणा करायला गेल्यास शेतकऱ्यांना बॅंकेत पाठविले जाते. या ठिकाणी दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. मार्केटिंग फेडरेशनचे कार्यालय जळगाव शहरात आहे, त्यामुळे अधिक लांब अंतरावरून शेतकरी जळगावात येऊन फेडरेशनच्या कार्यालयात विचारणा करीत नाहीत. सुमारे ७८ हजार क्विंटल तुरीची खरेदी नऊ शासकीय खरेदी केंद्रांवर झाली होती.

तुरीची जळगाव येथील केंद्रात अडीच महिन्यांपूर्वी विक्री केली होती. परंतु, अजूनही चुकारे मिळालेले नाहीत. रोज शहरात संबंधितांकडे जातो, परंतु कुणी दखल घेत नाही, अशी भावना एका तूर उत्पादकाने व्यक्त केली.

  हरभरा उत्पादकांना १००० रुपये अनुदान
नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली, परंतु हरभऱ्याची विक्री केंद्र बंद झाल्याने होऊ शकली नाही, अशा शेतकऱ्यांना १००० रुपये अनुदान एक क्विंटलमागे एक हेक्‍टर मर्यादेसाठी दिले जाणार आहे. या संदर्भात जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये संबंधित नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी, क्षेत्र यांची पडताळणी सुरू आहे. सुमारे १७०० शेतकरी जिल्ह्यात हरभरा विक्रीपासून वंचित राहिले होते. उताऱ्यावरील नोंदींची पडताळणी झाल्यानंतर संबंधित माहिती मार्केटिंग फेडरेशन शासनाकडे पाठविल, असे मार्केटिंग फेडरेशनचे पणन अधिकारी परिमल साळुंखे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...