agriculture news in marathi, turmaric harvesting starts, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात हळद काढणीची लगबग सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सांगली   ः जिल्ह्यातील हळद राज्यात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात हळदीला मोठी बाजारपेठही आहे. त्याचप्रमाणे हळदीचे क्षेत्र ही जास्त आहे. यंदाचा हळद हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हळद काढणीसाठी नियोजन करू लागले आहेत. सध्या अनेक ठिकाणी हळद काढणीची लगबग सुरू झाली आहे.

सांगली   ः जिल्ह्यातील हळद राज्यात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात हळदीला मोठी बाजारपेठही आहे. त्याचप्रमाणे हळदीचे क्षेत्र ही जास्त आहे. यंदाचा हळद हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हळद काढणीसाठी नियोजन करू लागले आहेत. सध्या अनेक ठिकाणी हळद काढणीची लगबग सुरू झाली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी हळदीचे क्षेत्र १०६० हेक्‍टर होते. यंदा हळदीच्या क्षेत्रात २४० हेक्‍टरने वाढ झाली आहे. यंदा हळदीचे एकूण क्षेत्र सुमारे १३०० हेक्‍टर आहे. जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर सेलम, १५ टक्के क्षेत्रावर कृष्णा, ५ टक्के क्षेत्रावर फुले स्वरूपा या जातीच्या हळदीची लागवड करण्यात येते. हंगाम सुरू झाल्याने हळद उत्पादक पीक काढणीत व्यस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हळदीची लागवड केली होती. त्यामुळे आगाप केलेल्या हळदीच्या लागवडीची काढणी सुरू झाली आहे.

सध्या वाळवा तालुक्‍यात हळद काढणीचा प्रारंभ झाला आहे. येत्या पंधरा दिवसांनंतर हळद काढणीला गती येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज तालुक्‍यांतील शेतकरी हळद काढणीसाठी नियोजन करत आहेत. या भागात हळदीची काढणी यंत्राद्वारे केली जाते आहे. हळद काढणीसाठी मजुरांची कमतरता जाणवत आहे. हळद काढणीसाठी सध्या १५ टक्के शेतकरी यंत्राचा वापर करत आहे तर ७० ते ८० टक्के शेतकरी हळदीची काढणी मजुरांद्वारे करीत आहेत.

टॅग्स

इतर बातम्या
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...