सांगलीत हळदीचे दर वधारले

हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार हळदीची विक्री केली आहे, तसेच हळदीला मागणी वाढली आहे. यामुळे हळदीच्या दरात वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची हळद विक्रीस आली नाही, अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. - एन, एम. हुल्याळकर, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली.
हळद खरेदी
हळद खरेदी

सांगली  ः वाढती मागणी आणि निर्यातीमुळे हळदीच्या दरात ८०० ते १००० रुपये क्विंटलने वाढ झाली आहे. येथील बाजार समितीत हळदीचे सौदे दिवसातून दोन वेळा सुरू आहेत. येथील बाजार समितीत हळदीला सध्या ६५०० ते ११३०० रुपये तर सरासरी ९२५० रुपये क्विंटल अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही हळदीची मोठी बाजारपेठ आहे. येथे सांगली जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, नांदेड, वसमत या ठिकाणाहून हळद विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येते. गेल्या तीन वर्षांपासून हळदीचे दर स्थिर आहेत.

हळद लागवडीच्या वेळी तमिळनाडू राज्यासह इतर राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे हळदीच्या लागवडीतही काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, शिल्लक हळदीमुळे दरात वाढ होणे शक्‍य नसल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

हळदीचे सौदे सुरू झाल्यानंतर हळदीचे दर १३ हजार प्रतिक्विंटल असे दर होते. मात्र, त्यानंतर दर कमी झाले. दरम्यान ८५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून हळदीच्या आवकेत घट झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

हळदीला गतवर्षीपेक्षा यंदा मोठी मागणी आहे, तसेच हळदीची निर्यातही चांगली झाली आहे. यामुळे हळदीच्या दरात ८०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. हळदीची विक्री अजून २० ते २५ टक्के शिल्लक आहे. अजून दर वाढण्याची शक्‍यता आहे.  

सांगली बाजार समितीत आवक झालेली स्थानिक हळद (आवक व दर क्विंटल)
तारीख आवक  किमान कमाल सरासरी
३१८१७  ६५००   १२५०० ९५००
४  १५२६४ ६५०० १२७०० ९१००
५  ३८१२  ६५०० १२०००  ९२५०
सांगली बाजार समितीत आवक झालेली परपेठी हळद (आवक व दर क्विंटल)
तारीख आवक किमान कमाल सरासरी
२३४९  ६००० ८५५० ७२७५
९५७१ ६५००  १०००० ८२५०
८१७ ६५००  ९८०० ८१५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com