वऱ्हाडात हळद लागवड क्षेत्रात घट
गोपाल हागे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017
दरवर्षी साडेतीन ते चार एकरांवर हळद लागवड होत असते. या वर्षी पावसाबाबतचे अंदाज व उपलब्ध पाणी पाहता क्षेत्र कमी होऊन अडीच एकरांवर लागवड झाली आहे. मध्यंतरी या पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसत होता. त्यावर निर्मूलनासाठी कीडनाशकाची फवारणी करण्यात आली. सध्या तरी पिकाची स्थिती चांगली आहे.  
- अनिकेत वाघमारे, शेतकरी, घाटबोरी, ता. मेहकर, जि. अकोला.
अकोला : पर्यायी पीक म्हणून वऱ्हाडातील शेतकरी हळद लागवडीकडे वळू लागले असतानाच, या हंगामात हळदीचे क्षेत्र तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कमी झालेले पाणी, गेल्या हंगामातील बाजारभाव आणि घटलेली उत्पादकता या कारणांमुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी केले.
 
गेल्या काही हंगामापासून या भागात हळदीच्या लागवडीत वाढ होत होती. मागील हंगामापर्यंत हे चक्र सुरू होते. परंतु दोन-तीन वर्षांत पावसाचा लहरीपणा कमालीचा वाढला. त्यातच मागील वर्षी हळदीला कमी दर मिळाले. सध्या इतर पिकांच्या तुलनेत हळदीसारखे पीक हे शेतकऱ्यांना पर्याय मिळाले. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने हळद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर वाढत होता.
 
या जिल्ह्यात रिसोड, मालेगाव, वाशीम या तालुक्यांमध्ये हळद लागवडीचे क्षेत्र अधिक राहत असते. परंतु या हंगामात या तालुक्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने लागवड कमी केली. त्यामुळे २५ ते ३० टक्के क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.  जूनमध्ये पाऊस पडला की हळद लागवड सुरु होते. या हंगामात पावसाने दमदार सुरवात केली. परंतु नंतर पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांनी अंदाज घेत हळद लागवड कमी केली. दुसरीकडे या मोसमात लागवड कमी झाली असून, तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही हीच स्थिती आहे. यामुळे आगामी काळात हळदीचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. 
 
या मोसमात लागवड झालेल्या हळदीला कमी पावसाचा फटका बसला. हळदीची सर्वच भागांत वाढ कमी झालेली आहे. रोपांवर करप्यासह अन्य रोग आढळून आले. या मोसमात सरासरी ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडलेला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...