agriculture news in Marathi, Turmeric rates may be increased in this season, Maharashtra | Agrowon

हळदीचा हंगाम दिलासादायक राहण्याचे संकेत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

या वर्षी हळदीचा हंगाम चांगला राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात वाशीम जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. एकट्या शिरपूर परिसरात दोन हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर हळद होते. सध्या साडेआठ ते नऊ हजार रुपये क्‍विंटलचे दर आहेत. आवक कशी राहील त्यावर यापुढे दर ठरतील. तरीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा हंगाम चांगला राहण्याचा अंदाज आहे.
- डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम

वाशिम ः राज्यात या वर्षी हळदीचा हंगाम आशादायक राहण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात हळदीचे माहेरघर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळला. या वर्षी सुरवातीला हळदीचे दर साडेसात हजार ते ८ हजार रुपये क्‍विंटल राहतील, अशी शक्‍यता शिरपूर जैन (जि. वाशीम) येथील हळद उत्पादक डॉ. गजानन ढवळे यांनी व्यक्‍त केली होती.

वाशीम जिल्ह्याने सोयाबीनसोबतच गेल्या काही वर्षांत हळद उत्पादनाच्या बाबतीत नवी ओळख मिळविली आहे. लागवड क्षेत्र वाढते असल्याने रिसोड व वाशीम बाजार समितीत आठवड्यातील ठराविक दिवशी हळद खरेदी होते; परंतु स्थानिक बाजारात विकण्याऐवजी हिंगोली बाजारपेठेत शेतकरी हळद विक्रीला प्राधान्य देतात. या वर्षी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यात हळदीखालील कमी झालेले लागवडक्षेत्र त्यासोबतच पाण्याच्या उपलब्धतेचा फटका बसत महाराष्ट्रातदेखील उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळदीला चांगले दर राहतील, असा अंदाज आहे. 

गेल्या वर्षी हळदीचे दर साडेचार ते पावणेपाच हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले होते. २०१७ च्या जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दरात वाढ होण्यास सुरवात हाेत हे दर ९ ते साडेनऊ हजार रुपयांवर पोचले. या वर्षी सांगली बाजारात नव्या हळदीची आवक झाली. त्या वेळी मुहूर्तला साडेतेरा हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला होता. आता हे दर साडेआठ ते नऊ हजार रुपये क्‍विंटलवर स्थिरावल्याचे डॉ. गजानन ढवळे यांनी सांगितले.

एप्रिलपासून होतो हंगाम सुरू
निझामाबाद ही हळदीकरिता मोठी पेठ आहे. तेथील आवक दरावर परिणाम करणारी ठरते. महाराष्ट्रातदेखील एप्रिलपासून हंगाम जोरात सुरू होतो. मार्चमध्ये काढणी त्यानंतर तीन आठवड्यांची सरासरी प्रक्रिया करून हळद बाजारात पोचते. आंध्र प्रदेश तसेच सांगली परिसरात पूर्वहंगामी म्हणजेच अक्षयतृतीयेला लागवड होते. त्याची आवक जानेवारीत सुरू होते. उर्वरित भागात दीड महिन्यानंतर लागवड होते. त्यामुळे बाजारातील आवकदेखील उशिरा होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दर चांगले राहतात. संक्रातीनंतर दर कमी होतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.  

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...