हळदीची लागवड यंदा वाढली

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडीच महिन्यांची भरणी करणे सोपे जाणार आहे. भरणी केल्याने कंद कुज, कंद माशी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही; तसेच व्यवस्थापक करणे शक्‍य होईल. - डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी,हळद संशोधन योजना कसबे डिग्रज, ता. मिरज.
हळद लागवड
हळद लागवड

सांगली ः राज्यात अपेक्षित पाऊस झाल्याने हळदीची लागवड पूर्ण झाली आहे. राज्यात हळदीचे सरासरी क्षेत्र जवळपास १७ हजार ५०० हेक्‍टर असून, यंदाच्या हंगामात सुमारे २० हजार हेक्‍टर लागवड झाली आहे. गतवर्षीपेक्षा हळदीच्या क्षेत्रात २५०० हेक्‍टरने वाढ झाली आहे. राज्याचे हळदीचे सरासरी क्षेत्र अंदाजे १७ हजार ते १८ हजार इतके आहे. राज्यात यंदा सुरवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीस प्राधान्य दिले. राज्यातील नांदेड, वसमत या दोन जिल्ह्यांत हळदीचे क्षेत्र अधिक आहे. त्याखालोखाल सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हळद उत्पादन होते. गेल्या वर्षी हळद हंगामात सुरवातीच्या काळात हळदीचा सरासरी ९ हजार ते १२ हजार प्रतिक्विंटल असा दर मिळाला. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हेच दर सुमारे तीन हजार रुपयांनी कमी झाले होते. हळदीकडे पैसे देणारे पीक म्हणून पाहिले जाते. यामुळे बाजारात तेजी मंदी आली तरी शेतकरी याचा अभ्यास करून हळदीची विक्री करतात.  राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पादन वाया गेले. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस पीक घेण्याऐवजी हळद पिकाची लागवड करण्यास पसंती दिली. यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, अशी माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली. गेल्या तीन वर्षांत सुमारे १५ हजार ते १८ हजार हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली. तीन वर्षांचा आढावा घेतल्यास यंदा हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.  सांगली जिल्ह्यात २०० हेक्‍टरने वाढ जिल्ह्यात हळदीचे दरवर्षी सुमारे ९०० ते १००० हेक्‍टर हळदीचे क्षेत्र असते. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव हळद उत्पादन घेणारे तालुके आहेत. यंदा हळदीच्या क्षेत्रात २०० हेक्‍टरने वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com