agriculture news in marathi, Turn to the scientific method for goats farm | Agrowon

शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जानेवारी 2018

जालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव मिळाले आहे. त्याअनुषंगाने आपल्या शेळीपालनाच्या पारंपरिक पद्धती सोडून शास्त्रोक्‍त पद्धतीने शेळीपालन करण्याची गरज असल्याचा सल्ला पशुतज्ज्ञ डॉ. श्रीकांत सटाले यांनी दिला.

जालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव मिळाले आहे. त्याअनुषंगाने आपल्या शेळीपालनाच्या पारंपरिक पद्धती सोडून शास्त्रोक्‍त पद्धतीने शेळीपालन करण्याची गरज असल्याचा सल्ला पशुतज्ज्ञ डॉ. श्रीकांत सटाले यांनी दिला.

सकाळ ॲग्रोवनच्या वतीने जालन्यातील आझाद मैदानावर आयोजित प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २०) आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन या विषयावर पशुतज्ज्ञ डॉ. सटाले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सटाले म्हणाले, शेळीपालन एक सक्षम पर्यायी पूरक उद्योग म्हणून पुढे आला आहे; परंतु या उद्योगाकडे छंद म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून बघण्याची गरज आहे. अत्यल्प खर्चाचा, मार्केटिंग करण्याची गरज नसलेला, कोणतेही प्रशिक्षण वा प्रमाणपत्राची गरज नसलेला हा उद्योग आहे.

फक्‍त आपल्याला हा उद्योग नेमका कशासाठी करायचा ते ठरवून त्यानुसार शेळ्यांचे आहार, स्वच्छता, आरोग्य आदींचे व्यवस्थापन केल्यास शेळीपालनात हमखास उत्पन्न मिळते. मटनाच्या अनुषंगाने शेळीपालन करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्या भागात कोणत्या शेळीच्या मांसाला मागणी आहे, त्याचा अभ्यास करूनच शेळीपालन करावे. पुणे, मुंबईसारख्या शहराच्या परिसरातील शेतकऱ्यांनी आता डेंगीवर शेळीचे दुध गुणकारी असल्याचे पुढे आल्याने शेळीचे डेअरीमार्फत दुध विक्री करणे सुरू केले आहे.

मराठवाडा, विदर्भासारख्या भागात मात्र अशा पद्धतीने दुधाची विक्री करता येणे शक्‍य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेळीपालनाचा पर्याय निवडताना आपल्या वातावरणाशी समरस झालेल्या उस्मानाबादी, संगमनेरी, थॅलीचरी, बेरारी वा कोकन कन्या या शेळीच्या जातीची निवड करणे जास्त फायद्याचे ठरते, असे डॉ. सटाले यांनी सांगितले.

मध्यम वजन, दोन वर्षांत तीन वेळा वेत, प्रत्येक वेताला दोन पिले देण्याची क्षमता आपल्या राज्यातील विविध भागानुसार समरस झालेल्या शेळ्यांच्या वानामध्ये आहे. पालनासाठी शेळ्यांची निवड करताना बाजारातून शेळ्या विकत घेणे कटाक्षाने टाळा. कास व पिले बघून शेळ्यांची निवड करण्याचा सल्ला डॉ. सटाले यांनी दिला.

कृत्रिम रेतन पद्धतीने शेळी भरता येणे शक्‍य असल्याने त्याकडेही शेळीपालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. शेळीपालन रुपयात नव्हे, तर पैशात केल्यास फायद्याचे ठरू शकते. लसीकरण, जंतनाशक, आदींविषयीही डॉ. सटाले यांनी शेतकऱ्यांना मार्गर्शन केले.

महत्त्वाचे सल्ले
  -  बाजारातून शेळ्या निवडणे टाळा
  -  वजन वाढविण्यासाठी लहानपणी प्रोटीनयुक्‍त चारा द्या
  -  जन्मानंतर पिलाला अर्ध्या तासात चिक पाजल्याने पिलाची प्रतिकारक्षमता वाढते  
  - पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मरतूक नको.
  -  शेळ्यांना लस देणे टाळू नका.
  - लेंडी तपासून जंतनाशक द्या.
  -  विभागून चारा देण्याची सोय करा.
  -  दिवसभरात सकाळी खुराक, दहा वाजता लसूनघास, दुपारी ऊर्जा चारा, संध्याकाळी झाडपाला असे आहाराचे नियोजन हवे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...