agriculture news in marathi, Turn to the silk as a conventional crop option | Agrowon

पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून रेशीमकडे वळा : अजय मोहिते
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

लाडसावंगी,जि. औरंगाबाद : बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे कापूस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट होऊन नुकसान झाले आहे. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कमीत कमी खर्चात, कमी कालावधीत आणि कमी श्रमात हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीमकडे वळण्याचा सल्ला जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक अजय मोहिते यांनी दिला.

लाडसावंगी,जि. औरंगाबाद : बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे कापूस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट होऊन नुकसान झाले आहे. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कमीत कमी खर्चात, कमी कालावधीत आणि कमी श्रमात हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीमकडे वळण्याचा सल्ला जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक अजय मोहिते यांनी दिला.

महाराष्ट्र शासन वस्त्रोउद्योग विभागाच्या जिल्हा रेशीम कार्यालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान महारेशीम अभियान आयोजित केलेले आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून पिंपळखुंटा (ता. औरंगाबाद) येथे नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अजय मोहिते म्हणाले, हमखास येणारे पीक म्हणजे रेशीम शेती होय. पारंपरिक पिकांना रेशीम शेती एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर रेशीम शेतीसाठी शासनाकडून मनरेगा योजनेतून अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेती करावी.

या वेळी बार्टीचे समतादूत सुभाष राठोड, सरपंच दगडू डोंगरे, शेतकरी रामदास कुबेर, अविनाश दाभाडे, रामेश्वर दाभाडे, भाऊसाहेब पडूळ, भगवान पडूळ, प्रदीप दाभाडे, विष्णू दाभाडे, निवृत्ती पडूळ, प्रकाश दाभाडे, पांडुरंग पडूळ, नामदेव दाभाडे, अशोक पडूळ, अंबादास पडूळ, भगवान पवार, गणेश हेकाडे, उत्तम आहेरकर, देवराव पडूळ, निवृत्ती दाभाडे, उद्धव दाभाडे, रावसाहेब पवार, ईश्वर बैनाडे, रामसिंग बारवाल, नाबाजी दाभाडे, संजय दाभाडे आदींसह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अॅग्रोवन सेंद्रिय शेती विशेषांकांचे वाटप करण्यात आले.

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...