agriculture news in marathi, The turnover of flowers in the festival of Ganeshotsav is 8.83 million | Agrowon

गणेशोत्सवात फुलांची ८ कोटी २३ लाखांची उलाढाल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

पुणे ः यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात पुणे बाजार समितीमधील फूल बाजारातील विविध फुलांची आवक सुमारे १४ हजार २३८ क्विंटल इतकी आवक झाली हाेती. तर उलाढाल सुमारे ८ कोटी २३ लाख ५१ हजार ४४१ रुपये झाली. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विविध फुलांनी तुलनेने कमी दर मिळाले. आता विजयादशमीला (दसरा) चांगल्या दराची आशा शेतकऱ्यांना आहे.   

पुणे ः यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात पुणे बाजार समितीमधील फूल बाजारातील विविध फुलांची आवक सुमारे १४ हजार २३८ क्विंटल इतकी आवक झाली हाेती. तर उलाढाल सुमारे ८ कोटी २३ लाख ५१ हजार ४४१ रुपये झाली. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विविध फुलांनी तुलनेने कमी दर मिळाले. आता विजयादशमीला (दसरा) चांगल्या दराची आशा शेतकऱ्यांना आहे.   

गणेशाेत्सवाचे नियाेजन करून शेतकऱ्यांनी झेंडू, गुलछडी, शेवंती आदी विविध फुलांबराेबरच सजावटीसाठीच्या फुलांची लागवड केली हाेती. गणेशाेत्सवामध्ये पूजेसाठीचे हार तसेच गाैरींच्या सजावटीसाठी फुलांची मागणी वाढली हाेती. घरगुती मागणीसह विविध सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांकडून हारांना १० दिवस माेठ्या प्रमाणावर मागणी हाेती. यामुळे शहरातील उपनगरांसह जिल्हा आणि परजिल्ह्यांमधून देखील फुलांना मागणी वाढली हाेती.

सजावटींच्या फुलांमध्ये जर्बेरा, कार्नेशियन, लिलीयम, आर्कीड, सह धार्मिक विधींसाठी शेवंती, गुलछडी, केवडा आदी फुलांना मागणी वाढली हाेती. दरवर्षी शेवंतीची परराज्यातून माेठी आवक होत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांत स्थानिक शेतकरी शेवंतीचे उत्पादन घेऊ लागल्याने राजा शेवंती, भाग्यश्री, पिवळी भाग्यश्री आदी प्रकारातील शेवंतीची आवक वाढली. त्यामुळे स्थानिक शेवंती उत्पादक शेतकऱ्याना यंदा फायदा झाला. यंदा शेवंतीला किलोस ५० ते १२० रुपये तर गुलछडी ४५० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

यंदा झेंडू वगळता इतर फुलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत स्थिर होते, अशी माहिती फूलबाजार विभागप्रमुख प्रदीप काळे यांनी दिली. तर गेल्यावर्षी फुलांची आवक कमी होती. त्यामुळे बाजार भाव चांगले मिळाले. यंदा आवक जास्त असल्यामुळे दरात तुनलेत घट झाली हाेती.

यंदा चांगला पाऊस, उपलब्ध पाण्यामुळे झेंडूचे माेठे उत्पादन झाले. त्यामुळे आवकदेखील मोठी झाली हाेती. यावर्षी किलाेला ३० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र, यंदा ५ ते ३० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर, गेल्यावर्षी गणेशोत्सवा दरम्यान झेंडूला किलोला ५० ते १२० रुपये भाव मिळाला होता, अशी माहिती आडते सागर भोसले यांनी दिली.

‘यंदा गणपतीसाठी दीड एकर झेंडूची लागवड केली हाेती. गणपतीच्या काळात दहा दिवसांत सुमारे ४ टन झेंडू पुणे बाजारात पाठविला हाेता. पहिले दाेन दिवस किलाेला १० ते २० रुपये दर मिळाला. मात्र, नंतरच्या दिवसांत ५ ते ७ रुपये दर मिळाला. यंदा अपेक्षित दर २० ते ३० रुपये हाेता. हाच दर गेल्या वर्षी ८० रुपयांपर्यंत हाेता. गणपतीत सर्वच भागात भरपूर लागवड असल्याने दसऱ्यासाठी फक्त अर्धा एकर झेंडू लावला आहे. दसऱ्याला ३० ते ४० रुपयांपर्यंत दर अपेक्षित आहे. हा दर मिळाला तरच काही तरी हातात राहिल. गेल्या वर्षी दसऱ्याला ६० रुपयांपर्यंत दर हाेता.’
- दीपक तरटे, बावधन, ता. वाई, जि. सातारा  

‘गणपती आणि दसरा दिवाळीसाठी यंदा अर्धा एकर भाग्यश्री आणि अर्धा एकर पाैर्णिमा वाण लावले हाेेते. गणपतीला भाग्यश्री वाण सुरू हाेता. दीड टन फुले गणपतीच्या काळात पुणे बाजारात पाठवले हाेते. यंदा किलाेला सरासरी ५० ते ५५ रुपये दर मिळाला. हा दर चांगला हाेता. तर दसरा आणि दिवाळीला पाैर्णिमा वाण सुरू हाेईल. याला १५० रुपयांपर्यंत दर मिळेल अशी अपेक्षा आहे.’
- तुषार डाेंगरे, यवत, जि.पुणे

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...