agriculture news in marathi, tuti crop become in trouble due to drought, parbhani, maharashtra | Agrowon

पाण्याअभावी होरपळली तुती; रेशीम उत्पादक अडचणीत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

पाच एकर शेती आहे. इतर पिकांपासून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने यंदा एकरभर तुती लागवड केली. एका बॅंचचे ७५ किलो कोष उत्पादन मिळाले. परंतु, दोन महिन्यांपूर्वीच पाणी कमी पडल्यामुळे सर्व तुती वाळून गेली. गावातील दहा ते बारा शेतक-यांची अशीच परिस्थिती आहे.
- मारोती देसाई, शेतकरी,  चुडावा, ता. पूर्णा, जि. परभणी.

नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेकडो एकरांवरील नवीन तुतीचे पीक होरपळून गेले आहे. त्यामुळे रेशीम कोष उत्पादन ठप्प झाले आहे. तुतीचे पीक समूळ होरपळून गेल्याने शेतक-यांना फटका बसला आहे. अनेक शेतक-यांना कोष उत्पादन सुरू ठेवण्यासाठी परत तुती लागवड करावी लागणार आहे.

सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पारंपरिक शेती पीकपध्दतीतून उत्पादनाची खात्री राहिली नसल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी तुलनेने कमी पाण्याची गरज असलेल्या तुतीची लागवड करून त्यावर आधारित रेशीम कोष उत्पादन व्यवसायाकडे वळले आहेत. परंतु, गतवर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाला. परिणामी, उद्भवलेल्या दुष्काळामुळे सद्यःस्थितीत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नसलेल्या शेतक-यांच्या शेतातील तुतीचे पीक जागीच होरपळून गेले आहे.

मार्चअखेर जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडील नोंदीनुसार जुनी आणि नवी मिळून नांदेड जिल्ह्यात ६८६ शेतक-यांनी ८३३ एकरांवर, परभणी जिल्ह्यात ८५६ शेतक-यांनी ९४० एकरांवर, हिंगोली जिल्ह्यातील ५२१ शेतक-यांनी ५५९.६५ एकरांवर याप्रमाणे तीन जिल्ह्यांतील २ हजार ६३ शेतक-यांनी २ हजार ३३२.६५ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. याशिवाय, अनेक शेतक-यांनी स्वखर्चाने तुती लागवड करून रेशीम कोष उत्पादन सुरू केलेले आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते तोपर्यंत या शेतक-यांनी रेशीम कोष उत्पादन घेतले.

परंतु, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चटका वाढल्याने या तीन जिल्ह्यांतील शेकडो एकरांवरील गतवर्षी आणि नवीन लागवड केलेले तुतीचे पीक मुळापासून होरपळून गेले आहे. जुनी लागवड असलेल्या अनेक शेतक-यांची तुतीची छाटणी केली आहे. परंतु, अनेक ठिकाणी जुन्या तुतीसाठीसुध्दा पाणी कमी पडत आहे. त्यामुळे रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी परत नव्याने तुती लागवड करावी लागणार आहे. यंदा जेमतेम कोष उत्पादन मिळाले, त्यात तुती जळून गेली. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

शेतकरी प्रतिक्रिया

अनेक वर्षांपासून रेशीम शेती करीत आहोत. याआधीच्या दुष्काळात तुतीचे पीक वाचविले. यंदा मात्र पाणी कमी पडत आहे. पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करावा लागणार आहे. 
- हरिभाऊ पगडे, शेतकरी,  धनगरवाडी, जि.नांदेड.

यापूर्वीच्या दुष्काळात टॅंकरच्या पाण्यावर तुती जगविली होती. यंदा मात्र खूप पाणी कमी पडत आहे. आमच्या गावातील सुमारे दहा एकरांवरील तुती पाण्याअभावी वाळून गेली आहे. त्या शेतक-यांना नव्याने तुती लागवड करावी लागेल. 
- सोपान शिंदे, शेतकरी,  पांगरा शिंदे, ता. वसमत, जि. हिंगोली.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...