नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडे

नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडे
नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडे

हिंगणा, नागपूर : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या अखत्यारीतील १२ तलाव कोरडे पडले आहेत. सहा तलवांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची पाण्याची सोय करताना पशुपालकांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

लघुसिंचन उपविभाग हिंगणाअंतर्गंत हिंगणा, नागूपर ग्रामीण व कामठी तालुक्‍यांतील १९ तलाव आहेत. मागील तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे तलावांत पाणीसाठा कमी आहे.

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच मार्च महिन्यात यावर्षी तलावाला कोरड पडली आहे. कोरड्या तलावांत उमरी, मांडवा, पोही, मांडवा, धोकडा दाभा, डेगमा, कोकर्डी, सातनवरी (२), सातनवरी (३), सातनवरी (४), आसलवाडा या तलावांचा समावेश आहे. येरणगाव, वलनी, चिंचोली, कालडोंगरी, खातमारी, सातनवरी (१) या तलावांमध्ये जेमतेम पाणीसाठा उरला आहे. मार्च महिन्यातच लघुसिंचन तलावाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.  

एप्रिल, मे व जून महिन्यात कडक उन्हाळा असतो. यामुळे आगामी सर्वच तलाव कोरडे पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या प्रशासनाकडून जनावरांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कोणते प्रयत्न होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वेणा, कृष्णेेतील जलपातळी खोल   हिंगणा तालुक्‍यातील वेणा नदीची जलपातळी कमालीची खालावली आहे. मार्च महिन्यातच पात्र उघडे पडले आहे. कृष्णा व दुर्गा नदीची देखील हीच स्थिती आहे. यामुळे नद्यांवर असलेल्या पाणीपुरवठा योजनांना याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com