agriculture news in marathi, Twenty-five percent of the product will be purchased of tur | Agrowon

उत्पादनाच्या पंचवीस टक्‍केच होणार तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदीत प्रत्येक तालुक्‍यात तुरीच्या एकूण उत्पादनापैकी २५ टक्‍केच तूर खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या ३१ जानेवारीच्या पत्रातच तसे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असताना उत्पादनाच्या २५ टक्‍के तूर खरेदी कशी ठरवणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदीत प्रत्येक तालुक्‍यात तुरीच्या एकूण उत्पादनापैकी २५ टक्‍केच तूर खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या ३१ जानेवारीच्या पत्रातच तसे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असताना उत्पादनाच्या २५ टक्‍के तूर खरेदी कशी ठरवणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर व बीड या तीन जिल्ह्यांत जवळपास ४१ हजारांवर शेतकऱ्यांनी हमीदराने तुरीच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील २० हजार, उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ हजार तर बीड जिल्ह्यातील ७ हजारांवर शेतकऱ्यांचा समावेश आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ठरवून दिलेल्या निकषानुसार तूर खरेदीचे व मशिनने ठरवून दिलेल्या धाग्यानुसार खरेदीचे काम सुरू आहे. यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात चारशे शेतकऱ्यांची ३२०० क्‍विंटल, लातूर जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांकडून ३ हजार ८९७ क्‍विंटल ७७ किलो, तर बीड जिल्ह्यात ५४७ शेतकऱ्यांकडून हेक्‍टरी साडेसहा क्‍विंटलप्रमाणे ५ हजार २५९ क्‍विंटल ८८ किलो तुरीची खरेदी करण्यात आल्याची माहिती संबंधित डीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील हेक्‍टरी उत्पादकतेच्या प्रश्नानंतर आता बीड जिल्ह्यातही शेतकऱ्यांकडून हेक्‍टरी उत्पादनाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे तालुकानिहाय कृषी विभागाकडून कळविण्यात आलेली उत्पादकता जवळपास साडेपाच ते बारा क्‍विंटल हेक्‍टरी असताना शासनाकडून कळविण्यात आलेली उत्पादकता साडेसहा क्‍विंटलची कशी याविषयी शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित होत असल्याने यासंदर्भात डीएमओ कार्यालयाकडून वरिष्ठ पातळीवर पत्र देऊन मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती डीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असली, तरी प्रत्यक्षात दरदिवशी कितीही केली तरी उत्पादनाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तुरीची खरेदी होण्याची शक्‍यता नसल्याचे जाणकारांचे म्हणने आहे. मग महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने आपल्या ३१ जानेवारीच्या पत्रात उत्पादनाच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खरेदी होणार नाही याची दक्षता घ्या असे म्हणून नेमके साधले काय हे कळायला मार्ग नाही.

अन्नदाता शेतकरी संघटनेने केला निषेध
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने आपल्या ३१ जानेवारीच्या पत्रात उत्पादनाच्या तुलनेत २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या केलेल्या उल्लेखाचा अन्नदाता शेतकरी संघटनेने निषेध केला आहे. शेतकऱ्यांची सर्व उत्पादित तूर शासनाने खरेदी करण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी पणन मंत्र्यांकडे केल्याची माहिती अन्नदाताच्या वतीने देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...