agriculture news in marathi, Twenty one million tons of sugarcane made by 20 factories | Agrowon

मराठवाड्यात वीस कारखान्यांनी केले २१ लाख टन गाळप
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

औरंगाबाद : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय औरंगाबाद अंतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यांत वीस कारखान्यांनी यंदा गाळपास सुरवात केली आहे. या कारखान्यांना १५ डिसेंबरअखेरपर्यंत  २१ लाख ६९ हजार १६९.१६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यातून १७ लाख ३५ हजार ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय औरंगाबाद अंतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यांत वीस कारखान्यांनी यंदा गाळपास सुरवात केली आहे. या कारखान्यांना १५ डिसेंबरअखेरपर्यंत  २१ लाख ६९ हजार १६९.१६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यातून १७ लाख ३५ हजार ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील बारामती ॲग्रो, संभाजी राजे, व मुक्‍तेश्वर शुगर्स या तीन खासगी साखर कारखान्यांनी यंदा नोव्हेंबरमध्ये ऊस गाळपास सुरवात केली आहे. दुसरीकडे नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा तापी, आदिवासी या दोन सहकारी व ॲस्टोरिया (पुष्पदंतेश्वर) या खासगी, जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी व संत मुक्‍ताबाई शुगर ॲन्ड एनर्जी, जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट १, रामेश्वर, समर्थ युनिट २ या सहकारी तर समृद्धी शुगर, श्रद्धा एनर्जी अॅन्ड इन्फा (बागेश्वरी) या खासगी, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, जयभवानी, माजलगाव, वैद्यनाथ, छत्रपती या सहकारी तर येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्यांचा गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांमध्ये समावेश आहे.

नंदूरबार जिल्ह्यात तीन साखर कारखान्यांनी २ लाख २४ हजार २१६.७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ८० हजार २२० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या जिल्ह्यात साखरेचा उतारा ८.०४ इतका राहिला. जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखान्यांनी १ लाख ४० हजार ६६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ५ हजार २५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगावच्या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.४८ इतका राहिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३ लाख ७५ हजार ३६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ०२ हजार ५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा ८.०५ टक्‍के इतका राहिला. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ५ लाख २७ हजार ८०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख १९ हजार २५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.

या जिल्ह्याचा साखर उतारा ७.९४ टक्‍के इतका राहिला. बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी ९ लाख ०१ हजार ११२.८४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख २९ हजार २०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा ८.०९ इतका राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

साखर उतारा ९.५० टक्‍क्‍यांच्या आतच
यंदा उस गाळपास सुरवात करणाऱ्या मराठवाड्यातील तीन व खानदेशातील तीन मिळून सहा जिल्ह्यांतील वीसही कारखान्यांचा साखर उतारा ९.५० च्या आतच आहे. सर्वाधिक साखर उतारा बीड जिल्ह्यातील येडेश्वरी शुगरचा ९.३२ टक्‍के इतका आहे. तर सर्वात कमी साखर उतारा जालन्यातील समृद्धी शुगरचा ६.१२ टक्‍के इतकाच आल्याची माहिती साखर विभागाकडून देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...