नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे अडीच लाखांवर अर्ज
ज्ञानेश उगले
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीककर्जमाफीसाठी नाशिक जिल्ह्यातून दोन लाख 66 हजार 133 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. आता संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातील माहिती भरण्याचे काम बॅंका करणार आहेत.

सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ केले जाण्याची घोषणा केलेली आहे. दीड लाखावर कर्ज असल्यास वरील रक्कम भरल्यानंतरच दीड लाख रुपये माफ होणार आहेत. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 25 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी सरकारने ऑनलाइन अर्ज भरण्याची सक्ती केली होती.

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीककर्जमाफीसाठी नाशिक जिल्ह्यातून दोन लाख 66 हजार 133 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. आता संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातील माहिती भरण्याचे काम बॅंका करणार आहेत.

सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ केले जाण्याची घोषणा केलेली आहे. दीड लाखावर कर्ज असल्यास वरील रक्कम भरल्यानंतरच दीड लाख रुपये माफ होणार आहेत. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 25 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी सरकारने ऑनलाइन अर्ज भरण्याची सक्ती केली होती.

पण, सुरुवातीलाच गटसचिवांचे आंदोलन सुरू असल्याने कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी होण्यात खोडा घातला गेला होता. हे आंदोलन संपल्यानंतर तीन दिवस सर्व्हर डाउन असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रियाच बंद होती. महा-ई सेवा केंद्रांवरच ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी बाराशेवर केंद्रांची व्यवस्था संपूर्ण जिल्हाभरात करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेऊन ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सरकारने 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत संपूर्ण जिल्हाभरातून 2 लाख 66 हजार 133 शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने लेखी अर्ज केवळ दीड लाख इतकेच वाटप केले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त ऑनलाइन अर्ज भरण्यात आले आहेत.

आता बॅंका संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातील माहिती संगणकात भरणार आहेत. हेही काम ऑनलाइन असल्याने निकषात नेमका कोणता शेतकरी बसतो आणि कोणता नाही, हेही सहज ध्यानात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यादरम्यान ऑडिटरकडून या अर्जांची पडताळणीही केली जाणार आहे. शिवाय ऑनलाइन भरलेल्या अर्जांचे चावडीवाचन होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...