पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे दोन सुपुत्र हुतात्मा

पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे दोन सुपुत्र शहीद
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे दोन सुपुत्र शहीद

बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड हे जवान हुतात्मा झाले आहेत. शनिवारी (ता. १६) या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळाली अाहे. या दोन्ही शहीद जवानांमुळे बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली अाहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ११५ बटालियनचे जवान संजयसिंह राजपूत (मलकापूऱ) हुतात्मा झाले. त्यांच्या मागे अाई, दोन भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार अाहे. मलकापूर येथील वार्ड क्रमांक २१ मध्ये राहत असलेले संजय १९९६ मध्ये सैन्यात रूजू झाले होते. पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली होती. ११ वर्षांची देशसेवा केल्यानंतर त्यांनी पुन्हा पाच वर्षे सेवा वाढवून घेतली होती. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ते हुतात्मा झाले.

नितीन राठोड हे केंद्रीय राखीव दलाच्या तीन बटालियनमध्ये कार्यरत होते. लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धन नगर तांड्यातील नितीन केंद्रीय राखीव दलात २००६ मध्ये भरती झाले होते. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. ही घटना घडण्यापूर्वी चार दिवसांपूर्वीच पन्नास दिवसांची सुटी संपवून ते ११ फेब्रुवारीला कर्तव्यावर रुजू झाले होते. उद्या होणार अंत्यसंस्कार संजयसिंह राजपूत यांचे पार्थिव केंद्रीय राखीव दलाच्या ११५ बटालियनच्या नागपूर मुख्यालयात अाणण्यात येईल. येथे मानवंदना दिली जाईल. तेथून पार्थिव मलकापूर येथे नेले जाणार अाहे. तर नितीनचे पार्थिव पुण्यात ३ बटालियनच्या मुख्यालयात मानवंदना दिल्यानंतर गोवर्धननगर (जि. बुलडाणा) येथे अाणण्यात येईल. सकाळी या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार अाहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com