agriculture news in marathi, Two clerk of market committee arrested for taking bribe | Agrowon

बाजार समितीतील दोन लिपिकांना लाच घेताना अटक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्याकडून पदोन्नतीसाठी ४  हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना बाजार समितीचा मुख्य लिपिक महेंद्र मनोहर निकाळे (५३), लिपिक शंतनू नथुराम झोमन (४७) या दोघांना रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी (ता. ९) सकाळी बाजार समितीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्याकडून पदोन्नतीसाठी ४  हजार ४०० रुपयांची लाच स्वीकारताना बाजार समितीचा मुख्य लिपिक महेंद्र मनोहर निकाळे (५३), लिपिक शंतनू नथुराम झोमन (४७) या दोघांना रंगेहाथ अटक केली. शुक्रवारी (ता. ९) सकाळी बाजार समितीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार बाजार समिती कार्यालयात लिपिकपदावर कार्यरत आहेत. पदोन्नतीसाठी नाव वरच्या क्रमांकावर आहे. गुरुवारी (ता. ७) कार्यालयात असताना पदोन्नती देण्यासाठी मुख्य लिपिक महेंद्र काळे आणि लिपिक शंतनू झोमन या दोघांनी ४ हजार ४०० च्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. खात्री केल्यानंतर पथकाने कार्यालयात सापळा रचला. दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोघांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक भामरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इतर बातम्या
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन...गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...