हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदे

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीच्या आवकेत वाढ होते. यामुळे दिवसातून दोन वेळा सौदे केले जातात. मेअखेर दिवसातून दोन वेळा सौदे सुरू राहतील. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार हळदीची विक्री केली आहे. - दिनकर पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली.
हळद उत्पादन
हळद उत्पादन

सांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून हळदीची आवक वाढली असून दिवसातून दोन वेळा सौद्यास प्रारंभ झाला आहे. हळदीची सध्या दररोज सकाळच्या टप्प्यात १२ ते १५ हजार क्विंटल तर दुपारच्या टप्प्यात चार ते पाच हजार क्विंटल आवक होत आहे. हळदीला सध्या ८,१०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे.  महाराष्ट्रातील हळदीची अग्रगण्य बाजारपेठ म्हणून सांगली बाजार समितीची ओळख आहे. सांगली बाजार समिती हळदीसाठी महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे बाजारपेठेत सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, जळगाव या जिल्ह्यांबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यातूनही हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सांगली बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्‍वास असल्यामुळे दिवसेंदिवस व्यवहार वाढतच आहेत. यंदा राज्यात हळदीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ असली तरी कमी पाऊस आणि पाण्यच्या कमतरतेमुळे मराठावाडा आणि विदर्भात हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी उत्पादन स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या दरात तेजी होण्याची शक्यता फार कमी असल्याचेही सांगितले आहे. हळदीचे दर यंदा गतवर्षी सरासरी ८ हजार ते ९ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. यंदा हळदीचे असेच दर राहतील असा अंदाज व्यापारी आणि बाजार समितीने व्यक्त केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com