agriculture news in marathi, uddhav thackeray says government doing a scam in loan waiver scheme, nagar, maharashtra | Agrowon

सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव ठाकरे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषणा केली; मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. ‘तुम्हाला कर्जमाफी मिळाली का?’ असे उपस्थितांना विचारत सरकारने कर्जमाफीत घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. प्रत्येकास घर, खात्यावर पंधरा लाख, अच्छे दिन हा सारा जुमला असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषणा केली; मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. ‘तुम्हाला कर्जमाफी मिळाली का?’ असे उपस्थितांना विचारत सरकारने कर्जमाफीत घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. प्रत्येकास घर, खात्यावर पंधरा लाख, अच्छे दिन हा सारा जुमला असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

नगर येथे रविवारी (ता. २१) शिवसेनेतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी महापालिकेची भुयारी गटार योजना व अमृत पाणी योजनेचा प्रारंभ श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार विजय औटी, नीलम गोऱ्हे, महापौर सुरेखा कदम, माजी आमदार अनिल राठोड, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर या वेळी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की नगरसह राज्यातील अनेक भागांत दुष्काळ आहे, सरकारला मात्र पाहायला वेळ नाही. इतरांकडे जातीपातीच्या भिंती आहेत, पण छप्पर नाही. आम्ही भिंती नसल्या तरी चालेल, छप्पर देतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक वर्षे भाजप- शिवसेनेची युती आहे. मात्र भाजपला राममंदिराचा विसर पडला आहे. राज्यात महिला, मुले, नागरिक असुरक्षित आहेत. चांगेल काम करणाऱ्याला शिक्षा दिली जातेय. नगर जिल्ह्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची मिलीभगत असून ते सामाईकपणे गुंडगिरी करत आहेत, ती मोडून काढणार आहे. सरकार येण्याचा भाजपच्या लोकांना विश्‍वास नव्हता, असे त्यांचेच लोक सांगत असले, तरी अशाच लोकांचे सरकार येतेय. राज्यात दुष्काळ आहे, पाणी नाही, लोक पाण्यासाठी आजच भटकंती करत आहेत आणि सरकार मात्र घरपोच दारू देण्याचा विचार करतेय, असे सांगत सरकार आणि भाजपवर श्री. ठाकरे यांनी टीका केली.

‘आम्ही पोलखोल करू’
उद्धव ठाकरे म्हणाले, की आम्ही सरकारविरोधी बोलत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे; आम्ही सरकारविरोधी नाही, तर जनतेच्या बाजूने बोलतोय. विरोधात आहोत असे म्हणणारे गप्प आहेत. सरकार घोषणांचा पाऊस पाडतेय, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही. शिवसैनिक आता प्रत्येक लाभार्थ्याकडे जाऊन योजनांची पोलखोल करणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...