त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
नगर : ‘२०५० साली शेतकऱ्यांना दुप्पट भाव देऊ’, ‘२०२५ साली सर्वांना मोफत घरे देणार’, अशा घोषणा उद्धव ठाकरे करत असतानाच लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यावर श्री. ठाकरे म्हणाले, ‘अरे टाळ्या काय वाजवता? अशीच स्वप्ने दाखवूनच ते (भाजप) सत्तेत आले. म्हणून सांगतो, भानावर या, अशी स्वप्ने दाखविणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.’

पारनेर (जि. नगर) येथे शेतकरी मेळाव्याचे मंगळवारी (ता. २७) आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना श्री. ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. सध्याचे राज्यातील आणि देशातील सरकार फसवे आहे. मजबूत सरकार देशात यावे म्हणून भाजपला लोकसभेत मदत केली; मात्र नंतर त्यांना सत्तेची मस्ती चढली. त्यामुळे आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे आणि राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘बॅंका लुटून लोक बाहेर पळून जात आहेत. असे असताना नाव मातीमोल झाले तरी काही लोकांना काहीच वाटत नाही,’ अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचे नाव घेत नाही. छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकारला लोकांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. जिल्हा सहकारी बॅंकांना हे सरकार टाळे लावायची तयारी करत आहे. आज बॅंका ओरबाडून लोक पळून जात आहेत; पण सरकार काहीच करत नाही. नाव मातीमोल झाले तरी काही लोकांना काहीच वाटत नाही. देशाच्या, राज्याच्या हितासाठी आम्ही भाजपसोबत होतो; मात्र आता स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल.’’
- 1 of 347
- ››