agriculture news in marathi, Ujani dam, Solapur, Maharashtra | Agrowon

‘उजनी’तून भीमेत १३ हजार क्‍युसेकचा विसर्ग
सुदर्शन सुतार
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सोलापूर : उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात पुन्हा पाऊस झाल्याने उजनीकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे उजनीतूनही पुढे भीमा नदीमध्ये १३ हजार ५०० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.

बुधवारी (ता. १३) ३० हजार क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. मात्र गुरुवारी (ता. १४) ते १३ हजार ५०० क्‍युसेकरपर्यंत कमी करण्यात आले आहे. दौंड येथून धरणामध्ये ९ हजार ७०४ क्‍युसेकने पाणी मिसळत होते. या पाण्याचे प्रमाण कमी असले तरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे.

सोलापूर : उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात पुन्हा पाऊस झाल्याने उजनीकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे उजनीतूनही पुढे भीमा नदीमध्ये १३ हजार ५०० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.

बुधवारी (ता. १३) ३० हजार क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. मात्र गुरुवारी (ता. १४) ते १३ हजार ५०० क्‍युसेकरपर्यंत कमी करण्यात आले आहे. दौंड येथून धरणामध्ये ९ हजार ७०४ क्‍युसेकने पाणी मिसळत होते. या पाण्याचे प्रमाण कमी असले तरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे.

याशिवाय बंडगार्डनकडूनही ३२ हजार ७०० क्‍युसेक इतके पाणी येत आहे. पुढील एक-दोन दिवसांत पावसाचे प्रमाण वाढले, तर धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून धरण प्रशासनाने भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात केली आहे.

नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याशिवाय वीजनिर्मितीसाठी दीड हजार क्‍युसेक, कालव्यातून दोन हजार तर बोगद्यातून ६०० क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. पाण्याचा वेग पाहून पाणी आणखी सोडणे किंवा बंद करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, धरणामध्ये गुरुवारी (ता. १४) एकूण पाणीपातळी ४९७.२५५ मीटर इतकी राहिली. तर पाण्याचा एकूण साठा ३४६५.१० दलघमी (१२२.३६ टीएमसी) तर उपयुक्त साठा १६६२.२९ दलघमी (५८.७० टीएमसी) आणि पाण्याची टक्केवारी १०९.५६ टक्के इतकी होती.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...