agriculture news in marathi, Ujjani dam area will be measured by drone | Agrowon

ड्रोनद्वारे निश्‍चित होणार उजनीवरील क्षेत्र?
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर किती क्षेत्र सिंचनाखाली आहे. याचा निश्‍चित आकडा अद्यापही कोणत्याच यंत्रणेकडे नाही. असे असले तरी उजनी धरणावर सिंचनाचे क्षेत्र किती आहे? हे शोधणे आता शक्‍य होणार आहे, तेही ड्रोनच्या सहाय्याने. येत्या महिनाभरात हे क्षेत्र निश्‍चित होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. उजनीमुळे सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांना फायदा झाला आहे. यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची नोंद झाली आहे. उसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. 

सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर किती क्षेत्र सिंचनाखाली आहे. याचा निश्‍चित आकडा अद्यापही कोणत्याच यंत्रणेकडे नाही. असे असले तरी उजनी धरणावर सिंचनाचे क्षेत्र किती आहे? हे शोधणे आता शक्‍य होणार आहे, तेही ड्रोनच्या सहाय्याने. येत्या महिनाभरात हे क्षेत्र निश्‍चित होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. उजनीमुळे सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांना फायदा झाला आहे. यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची नोंद झाली आहे. उसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. 

धरणातून खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी पाणी सोडले जाते. या पाण्यावर शेतकरी पिके घेतात. जिल्ह्यात वाढलेल्या ऊस क्षेत्राला धरणच कारणीभूत आहे. एकीकडे सिंचनाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे धरणातील पाण्याच्या साठवण क्षमतेमध्ये गाळामुळे घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. धरणाचे पाणी आहे म्हटल्यावर त्या पाण्याचा वापर योग्य प्रकारे करण्याकडेही दुर्लक्ष केले जाते. एवढेच नाही तर पाणी मागणी अर्ज भरण्याकडेही शेतकरी लक्ष देत नाहीत, हे दुर्दैवाचेच म्हणावे लागेल. तरीही, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते.

एखाद्या शेतकऱ्याने सिंचनाखालील क्षेत्र एक एकर दाखवले असले तरी प्रत्यक्षात त्याचे क्षेत्र तीन ते पाच एकर एवढे असते. त्या क्षेत्रासाठीही धरणातील पाण्याचा वापर केला जातो. मात्र, कागदोपत्री ते क्षेत्र दाखविले जात नाही. पाण्याचा वापर होतो. मात्र, क्षेत्रच योग्य दाखविले नसल्याने त्याचा फटका पाटबंधारे विभागाला बसतो. त्याचबरोबर अनेकवेळा कालव्याचे पाणी वापरूनही माझे पीक विहिरीवरील पाण्यावर घेतल्याचे सांगण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. या सगळ्या प्रकारामुळे धरणावरील निश्‍चित सिंचित क्षेत्र किती? याचा अंदाजच येत नाही. हे टाळण्यासाठी आता या क्षेत्राची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किती हेक्‍टर अनधिकृत क्षेत्राला धरणातून पाणीपुरवठा होतो, हेही निश्‍चित होईल.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी, ड्रोनद्वारे होणाऱ्या मोजणीमुळे लाभ क्षेत्राची पिकरचना व व्याप्ती निश्‍चित होईल. व्याप्ती निश्‍चित झाल्यानंतर आकारणी वाढेल. आकारणी वाढल्यानंतर साहजिकच वसुली वाढण्यास मदत होईल. आकारणी करण्याची प्रक्रिया वेळेत होईल, अशी माहिती दिली. 

ड्रोनचा हेक्‍टरी खर्च 158 रुपये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने उजनीवरील सिंचन क्षेत्राची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने होण्याची शक्‍यता आहे. एक हेक्‍टर क्षेत्राची मोजणी करण्यासाठी ड्रोनला अंदाजे 158 रुपये खर्च येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...