agriculture news in marathi, ujni dam overflow, solapur, maharashtra | Agrowon

पुण्यातील पावसावर ‘उजनी’ने गाठली शंभरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सोलापूर   : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसताना, पुणे जिल्ह्यातील पावसावर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणाने मात्र सोमवारी (ता. २७) दुपारी बारा वाजता १०० टक्‍क्‍यांचा टप्पा पार केला. धरणातील या पाण्यामुळे परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाणी योजनांना लाभ होणार असला, तरी निम्मा जिल्हा अद्यापही तहानलेला आहे.

सोलापूर   : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसताना, पुणे जिल्ह्यातील पावसावर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणाने मात्र सोमवारी (ता. २७) दुपारी बारा वाजता १०० टक्‍क्‍यांचा टप्पा पार केला. धरणातील या पाण्यामुळे परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाणी योजनांना लाभ होणार असला, तरी निम्मा जिल्हा अद्यापही तहानलेला आहे.

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पुण्याकडील या धरणांतून उजनी धरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याचा विसर्ग  सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत तर हा विसर्ग झपाट्याने वाढला, तसा धरणातील साठाही वेगाने वाढला. सोमवारी दुपारी बारा वाजता दौंडचा विसर्ग ३९ हजार ९८१ क्‍युसेक इतका केल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत राहिले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०० टक्‍क्‍यावर पोचला.

उजनी धरणाच्या निर्मितीपासून यंदा १६ व्या वेळा धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले आहे. गेल्या ३७ वर्षांत अनेकदा ऐन पावसाळ्यात पाणीपातळीने मृतसाठा गाठला, तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठवेळा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पण यंदा जिल्ह्यात काहीशी दुष्काळाची परिस्थिती असताना, आता धरण शंभर टक्के भरल्याने पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ आणि मंगळवेढ्याचा काही भाग, या परिसराला दिलासा मिळणार आहे. पण, धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर, बार्शी या पट्ट्यात मात्र अजूनही पाण्यासाठी प्रतीक्षाचा वाट्याला आली आहे.

त्यातच यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला जूनमध्येच काही तो चांगला पाऊस झाला. पण, त्यानंतर त्याने प्रदीर्घ विश्रांती घेतली, ती थेट ऑगस्टपर्यंत, गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा त्याने सुरवात केली आहे. पण त्यात जोर नाही, जलसाठे होऊ शकतील, विहीर, बोअरला पाणी वाढेल, अशी स्थिती सध्या तरी नाही. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. यंदा आतापर्यंत सरासरी १५१.३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाच्या या बेभरवशामुळे खरिपातील मूग, मटकी, उडिद ही पिके जवळपास जळून गेली आहेत. आता केवळ सोयाबीन, तूर ही पिके हातात राहिली आहेत. पण, त्यांच्याही उत्पादनाबाबत साशंकता आहे. उजनीतील या पाण्याचा ऊसपट्ट्याला लाभ होणार आहे.

उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अखंडपणे सुरूच आहे. दौंडकडील विसर्ग सोमवारी दुपारपर्यंत ३९ हजार ९८१ क्‍युसेक इतका कायम होता. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होऊ नये, यासाठी धरणातून पुढे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातून नदीत पाच हजार क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्याशिवाय बोगद्यातून १०५०, कालव्यातून २३०० आणि सीना- माढा योजनेसाठी ३५० क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

धरणातील पाण्याची स्थिती
 एकूण साठा   ११७.२१ टीएमसी
उपयुक्त साठा  ५३.५६ टीएमसी
अचल साठा ६३.६५ टीएमसी
टक्केवारी १००

 

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...