agriculture news in Marathi, unapproved HT cotton seed spreads in India, Maharashtra | Agrowon

अवैध ‘एचटी’ बियाण्याचा देशात प्रसार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बोंड अळीचे नियंत्रण करणारे जनुक (बीजी टू) अधिक तणनाशक प्रतिकारक जनुक अशी दोन जनुके कपाशीत प्रत्यारोपित करून त्याचे वाण बाजारात बेकायदा आणण्यात आले आहे. आमच्या संस्थेच्या अंदाजानुसार भारतात या कापूस वाणाची सुमारे ३० ते ३२ लाख पाकिटे विकली गेली असावीत. 
- डॉ. सी. डी. मायी, अध्यक्ष, 
साउथ एशिया बायोटेक सेंटर, नवी दिल्ली

मुंबई  ः यंदाच्‍या खरीप हंगामामध्‍ये तेलंगणा व महाराष्‍ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक आणि मध्‍य प्रदेश या राज्‍यांमध्‍ये अवैध तणनाशक प्रतिकारक जनुकीय (एचटी) कपाशी बियाण्यांची ३५ लाख पॅकेट्सची विक्री झाली. ही विक्री हंगामात ४७२ कोटींवर झाली आहे. परवानगी नसताना विक्री झालेल्या ‘बिगबेल’, ‘वीडगार्ड’, ‘वीड्सगार्ड्‌स’, ‘बोलगार्ड’, ‘आरकॉट’, ‘क्रिल’ या ‘एचटी’ बियाण्यांवर जैवअभियांत्रिकी मान्यता समितीने  (जीईएसी) कारवाई करण्याची मागणी साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरने केली आहे.

पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय (एमओईएफअॅण्‍डसीसी) यांच्‍या सहकार्याने साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरने (एसएबीसी) सादर केलेल्‍या अहवालामधून मिळालेल्‍या माहितीनुसार, यंदाच्‍या खरीप हंगामामध्‍ये तेलंगण व महाराष्‍ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक व मध्‍य प्रदेश या राज्‍यांमध्‍ये अवैध ‘एचटी’ कापूस बियाण्यांची जवळपास ३५ लाख पॅकेट्सची विक्री करण्‍यात आली. प्रतिपॅकेट १३५० रुपये या सरासरी दराने विक्री झाली; पण सरकारमान्‍य वैध बीटी कापूस संकरितांच्‍या एक पॅकेटची किंमत ८०० रुपये आहे. यामुळे याच एका हंगामामध्‍ये सर्व लहान शेतकऱ्यांना या पॅकेट्ससाठी एकूण ४७२ कोटी मोजावे लागल्याचे उघड झाले आहे.

यंदाच्‍या हंगामात अवैधरीत्‍या विक्री करण्‍यात आलेल्‍या बियाणांची देशाच्‍या ३०० लाख एकर क्षेत्रापैकी २२ लाख एकरवर लागवड करण्‍यात  झाली. सरासरी एक हेक्‍टर किंवा २.४७१ हेक्‍टर्स लागवड पाहता, जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांनी या ‘एचटी’ कापूस बियाण्याची लावगड केली आहे. नागपूरस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च आणि हैदराबाद ये‍थील तेलंगण सरकारची डीएनए फिंगरप्रिंटिंग अॅण्‍ड ट्रान्‍सजेनिक क्रॉप्‍स मॉनिटरिंग लॅबोरेटरी या संस्‍थांनी अवैध ‘एचटी’ बियाणे लागवड झाल्याचे मान्य केल्याचा दावा साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरने केला आहे. 

सध्‍या, भारतात लागवडीसाठी फक्‍त जीएम कापूस संकरितांना/मिश्रणांना मान्‍यता आहे. या संकरितांमध्‍ये ''क्राय१एसी'' व ''क्राय१एबी'' जीन्‍स समाविष्‍ट आहेत. ही जीन्‍स बॅक्‍टेरियम बॅसिलस थुरिंजिनिसिसपासून (बीटी) तयार होतात. या जीन्‍सच्‍या प्रोटीन्‍ससाठी असलेले कोडिंग कापसांच्‍या किडींसाठी विषारी मानले जाते. या दोन प्रकारांव्‍य‍तिरिक्‍त जीएम वैशिष्टये असणाऱ्या इतर कोणाचाही कापूस तंत्रज्ञानाला सरकारने मान्‍यता दिलेली नाही. म्‍हणूनच एचटी तंत्रज्ञानाची विक्री एमओईएफअॅण्‍डसीसीचा ईपीए १९८६ व ईपीए कायदा १९८९ आणि कृषी व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाचे सीड्स अॅक्‍ट १९६६, सीड्स कायदा १९६८ व सीड्स (नियंत्रण) कायदा १९८३ या कायद्यांचे उल्‍लंघन करत असल्याचे साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरचे म्हणणे आहे

एचटी तंत्रज्ञान काय आहे? 
शेतकरी ‘एचटी’ बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत आणि या तंत्रज्ञानाचा वापर अपेक्षेपेक्षाही अधिक आहे. सामान्‍य कापूस लागवडीमध्‍ये, रोपे तयार झाल्‍यानंतर शेतकरी त्‍यांच्‍यावर तणनाशकांचा फवारणी करू शकत नाही. कारण हे तणनाशक तण व पिकांमधे फरक करू शकत नाही; पण ‘एचटी’ तंत्रज्ञानामुळे पिकांचा नाश न होता फक्‍त तणांचा नाश होतो.

बौद्धिक संपत्ती अधिकाराचे उल्लंघन 
 ‘एसएबीसी’च्या अहवालानुसार शेतकरी अधिक प्रमाणात अवैध ‘एचटी’ संकरितांना अधिक पसंती देतात. २०१५-१६ मध्‍ये अवैध ‘एचटी’ कापूस सं‍करितांच्‍या आठ लाख पॅकेट्सची खरेदी झाली. २०१६-१७ मध्‍ये हा आकडा १३ लाख पॅकेट्सपर्यंत, तर २०१७-१८ मध्‍येच कापूस लागवड करणाऱ्या मध्‍य व दक्षिणी प्रांतांमध्‍ये हा आकडा ३५ लाखांपर्यंत पोचला आहे. शेतकरी अवाढव्‍य किमतीतही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यास तयार आहेत. संघटित व अनोंदणीकृत बियाणे कंपन्‍या, तसेच काही नोंदणीकृत बियाणे कंपन्‍या ‘एचटी’ कापूस संकरित बियाणांची विक्री करतात. लेबलिंग व संपूर्ण माहितीसह ब्रॅण्‍डेड उत्‍पादन म्‍हणून किंवा विद्यमान उत्‍पादनांचा तुटवडा होतो म्‍हणून अवैध ‘एचटी’ कापूस बियाणांची विक्री होते. यामुळे शेतकरी फसवणूक होण्‍यासोबतच वैध प्रमाणित कापूस उत्‍पादनांच्‍या बौद्धिक संपत्‍ती अधिकारांचे उल्‍लंघन झाले आहे.

देशात सुमारे ३० लाख बेकायदा पाकिटांचा खप
‘साउथ एशिया बायोटेक सेंटर’ या नवी दिल्लीस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी म्हणाले की, बोंडअळीचे नियंत्रण करणारे जनुक (बीजी टू), अधिक तणनाशक प्रतिकारक जनुक अशी दोन जनुके कपाशीत प्रत्यारोपीत करून त्याचे वाण बाजारात बेकायदा आणण्यात आले आहे. यातील तणनाशक प्रतिकारक जनुकाचे तंत्रज्ञान असे आहे की, कपाशीत त्याची फवारणी केल्यास केवळ तणांचे नियंत्रण होते. मात्र कपाशीला त्यापासून हानी पोचत नाही. आमच्या संस्थेच्या अंदाजानुसार भारतात या कापूस वाणाची सुमारे ३० ते ३२ लाख पाकिटे विकली गेली असावीत. त्यातील महाराष्ट्रात १० ते १५ लाख पाकिटांची विक्री झाल्याची शक्यता आहे. अर्थात या विक्रीमागील सूत्रधार कोण आहेत हे सांगणे कठीण आहे. मात्र यातील काही वाणांच्या पाकिटांवर कंपनीचे पत्तेही देण्यात आलेले नाहीत. 
 

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...