agriculture news in Marathi, uncompleted well and government job promise not completed, Maharashtra | Agrowon

अपूर्ण विहीर, नोकरीचे आश्‍वासन हवेत विरले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

यवतमाळ : शेतकरी पितापुत्राच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने या कुटुंबाला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता गेल्या वर्षभरात झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा कोडगेपणामुळेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आशावाद निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप या पार्श्‍वभूमीवर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला आहे. 

यवतमाळ : शेतकरी पितापुत्राच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने या कुटुंबाला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता गेल्या वर्षभरात झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा कोडगेपणामुळेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आशावाद निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप या पार्श्‍वभूमीवर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला आहे. 

तीन एकर कोरडवाहू शेती, परिणामी वाढलेला कर्जाचा बोजा, नापिकी, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण या कारणांमुळे शेतकरी काशीराम मुधोळकर आणि त्यांचा मुलगा अनिल यांनी एकाच झाडाला गळफास लावत आत्महत्या केली होती. गेल्या वर्षी २३ ऑगस्ट २०१६ रोजी ही दुर्देवी घटना घडली. आजही या कुटुंबावर २७ हजार रुपयांचे खासगी कर्ज आहे. कुटुंबातील सहा सदस्यांच्या गरजा भागविण्याचे आव्हानदेखील कायम आहे. 

दरम्यान, पितापुत्राच्या आत्महत्येनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. आमदार राजू तोडसाम, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार ख्वॉजा बेग, माजी मंत्री संजय देशमुख, आमदार बच्चू कडू, विलास पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणीकराव ठाकरे यांनी या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यानंतर या कुटुंबांचे दुःख काहीसे दूर होईल, असे वाटत होते; परंतु आजही समस्यांच्या जोखडात हे कुटुंब असल्याचे वास्तव आहे. 

योजनेतील विहीर अपूर्णच 
काशीराम मुधोळकर यांच्या पत्नी अनुसयाबाईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रोजगार हमी योजनेतून विहीर देण्यात आली. गेल्या वर्षभरात ती पूर्ण झाली नाही. ५० कोंबड्या देण्यात आल्या; त्यातील ३५ पहिल्याच आठवड्यात आजारपणामुळे मेल्या. एक लाखाच्या चेकचा लाभ तो तेवढा मिळाला; मात्र प्रशासनाकडून सुनील या मुलास नोकरीचे आश्‍वास देण्यात आले होते. त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही.

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...