agriculture news in marathi, underground water level decreases in Parbhani district | Agrowon

परभणीत भूजलपातळी खालावली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

परभणी : जिल्ह्यातील भूजपातळीमध्ये आॅक्टोबरच्या तुलनेत ०.८९  ते ४.५१ मीटरने घट झाली आहे. परभणी तालुक्यातील भूजलपातळी सर्वाधिक म्हणजे ९.३७ मीटरपर्यंत खोल गेली आहे. आॅक्टोबरच्या तुलनेत जिंतूर तालुक्यातील भूजपातळीत सर्वाधिक म्हणजे ४.५१ मीटरने घट झाली आहे, असे भूजल सर्वेक्षण यंत्रणतर्फे घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. भूजलपातळी खालवत असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई उद्भवणार आहे.

परभणी : जिल्ह्यातील भूजपातळीमध्ये आॅक्टोबरच्या तुलनेत ०.८९  ते ४.५१ मीटरने घट झाली आहे. परभणी तालुक्यातील भूजलपातळी सर्वाधिक म्हणजे ९.३७ मीटरपर्यंत खोल गेली आहे. आॅक्टोबरच्या तुलनेत जिंतूर तालुक्यातील भूजपातळीत सर्वाधिक म्हणजे ४.५१ मीटरने घट झाली आहे, असे भूजल सर्वेक्षण यंत्रणतर्फे घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. भूजलपातळी खालवत असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई उद्भवणार आहे.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदीनुसार परभणी तालुक्यातील भूजलपातळी ६.५६ मीटर खोलीवर होती. जिंतूर तालुक्यात ३.६३ मीटर, सेलू तालुक्यात ५.६३ मीटर, मानवत तालुक्यात २.६३ मीटर, पाथरी तालुक्यात ५.७४ मीटर, सोनपेठ तालुक्यात ४.८६ मीटर, गंगाखेड तालुक्यात ७.४३ मीटर, पालम तालुक्यातील ४.८६ मीटर, पूर्णा तालुक्यातील भूजलपातळी ४.७० मीटर खोलीवर होती.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांतील झालेल्या उपशामुळे भूजलपातळी आणखी खोल गेली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरींतील नोंदीनुसार भूजलपातळीमध्ये ०.८९ ते ४.५१ मीटरने घट झाली आहे.

परभणी तालुक्यातील भूजलपातळी ९.३७ मीटर खोलवर गेली आहे. जिंतूर तालुक्यात ८.४१ मीटर, सेलू तालुक्यात ८.३९ मीटर, मानवत तालुक्यात ६.८ मीटर, पाथरी तालुक्यात ८.३६ मीटर, सोनपेठ तालुक्यात ८.७८ मीटर, गंगाखेड तालुक्यात ८.७१ मीटर, पालम तालुक्यात ६.९७ मीटर, पूर्णा तालुक्यात ५.१९ मीटर खोलवर गेली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये परभणी तालुक्यातील भूजलपातळी २.८१ मीटरने घटली आहे. जिंतूर तालुक्यातील भूजलपातळी ४.५१ मीटर, सेलू तालुक्यातील २.७६ मीटर, मानवत तालुक्यात ४.१७ मीटरने, पाथरी तालुक्यात २.६२ मीटर, सोनपेठ तालुक्यात ३.९२ मीटर, गंगाखेड तालुक्यात १.२८ मीटर, पालम तालुक्यात २.११ मीटर, पूर्णा तालुक्यात ०.४९ मीटर ने घटली आहे.

गतवर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यतील भूजलपातळी ०.४९ ते ५ मीटरने खोल गेली आहे. भूजलपातळी खालावत जात असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत त्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई भासत आहे. येत्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...