agriculture news in marathi, unfavorable weather conditions threats farmers | Agrowon

नांदेड जिह्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा संकटात
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

नांदेड : दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने वादळ, पाऊस, गारपिटीची भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. हाता ताेंडाशी आलेले हरभऱ्याचे पीक या अस्मानी संकटामुळे जाऊ नये अशी शेतकऱ्यांना धास्ती आहे.

नांदेड : दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने वादळ, पाऊस, गारपिटीची भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. हाता ताेंडाशी आलेले हरभऱ्याचे पीक या अस्मानी संकटामुळे जाऊ नये अशी शेतकऱ्यांना धास्ती आहे.

यंदा कमी व अनियमित पाऊस, विविध अळ्यांचा प्रादुर्भाव यामुळे यंदा पिके संकटात सापडली. खरीप हंगाम तर गेला किमान रब्बी हंगाम तरी हाती येईल या अपेक्षेत शेतकरी हाेता. विविध संकटांनी शेतकऱ्यांना ग्रासले आहे. यावर्षी वातावरण सर्वच पिकांसाठी प्रतिकूल असल्याने उत्पादनात माेठी घट झाली. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कायम राहिले. खरीप पीक हातचे गेले. ही कसर रब्बी पिकात भरून काढावी यासाठी शेतकरी कामाला लागले. पऱ्हाटी उपटून तसेच इतर पिकांचे शेत तयार करून रब्बी पिकातील हरभरा पेरला. त्याला अळ्या व विविध राेगांपासून वाचवताना खूप खर्च करावा लागला. गेल्या दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पीक हातून जाऊ नये अशी शेतकरी प्रार्थना करीत आहेत. हरभऱ्याची साेंगणी करून हरभरा तयार करावा तर सर्वच शेतातील हरभरा साेंगणीयाेग्य झाला नाही. शेतातील खाेलगट भागातील हरभरा अद्याप हिरवा आहे. मग साेंगणी व मळणी करावी की करू नये अशा द्विधा मनःस्थितीत 
शेतकरी सापडला आहे.

अपरिपक्व हरभऱ्याची साेंगणी केल्यास उत्पादनात घट येईल. 
हिरवा दाणा आल्याने भाव कमी मिळतील. जर हरभरा परिपक्व हाेण्याची वाट पाहिली तर अस्मानी संकटाने नुकसान हाेण्याची भीती. अनेक शेतकरी भाव व उत्पादनाचा विचार न करता हरभरा साेंगून मळणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. परिणामी हेळंबा, थ्रेशर मिळेनासे झाले आहेत. मागणी वाढल्याने त्यांनीसुद्धा भाव वाढविल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...