‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवी

‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवी
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवी

अकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर नियुक्तीसाठी किमान पात्रता (अर्हता) कृषी पदवी व तत्सम समकक्ष पदवी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने राज्याच्या कृषी खात्याच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे. यासंदभार्त दिलेल्या निवेदनात म्हटले, की शासनाने महसूल विभागातील तलाठी आणि मंत्रालयीन लिपिक संवर्गाची अर्हतादेखील पदवीच आहे. कृषी विभागात तांत्रिक कामे करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ‘पदवी’ ही पात्रता असणे गरजेचे आहे. शासनाच्या २९ मे १९९७ अन्वये कृषी खात्याची पुनर्रचना करून कृषी सहायकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे. संघटनेची शिर्डी येथे गेल्या महिन्यात बैठक होऊन त्यात कृषी सहायक-कृषी सेवक पदावर नियुक्तीसाठी किमान पात्रता कृषी पदवी व तत्सम समकक्ष पदवी बंधनकारक करण्यात यावी हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. शासनाने याचा विचार करून कृषी पदवी व तत्सम समकक्ष पदवी बंधनकारक करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राहुल राऊत, कार्याध्यक्ष सोमनाथ बाचकर, कोशाध्यक्ष अनंत देशमुख, सरचिटणीस वसंत जारीकोटे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी आयुक्त, कृषी सहसंचालकांना निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com