agriculture news in marathi, Union minister and BJP leader Ananth Kumar passes away at 59 | Agrowon

केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचे निधन
वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

बंगळूरूतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी 9 नंतर बंगळूरुतील नॅशनल कॉलेजच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्येही उपचार करण्यात आले होते.

दक्षिण बंगळूर लोकसभा मतदार संघातून गेल्या 22 वर्षांपासून ते निवडून येत होते. केंद्रातील भाजप सरकारमधील विश्वासू मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा होती. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर त्यांना सुरवातीला रासायनिक व खते मंत्रालय देण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2016 पासून ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहत होते. मोदी सरकारमधील निधन झालेले हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी गोपीनाथ मुंडे, अनिल दवे आणि आता अनंत कुमार यांचे निधन झाले आहे.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, की केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने देशाला विशेष करून कर्नाटकच्या नागरिकांसाठी मोठा झटका आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की माझा सहकारी आणि मित्र अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ते एक चांगले नेते होते. तरुणपणात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अत्यंत कष्ट करत ते नागरिकांची सेवा करत राहिले. त्यांना कायम त्यांच्या चांगल्या कामासाठी लक्षात ठेवले जाईल.

इतर ताज्या घडामोडी
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पाण्याअभावी होरपळली तुती; रेशीम उत्पादक...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी...
हुमणी नियंत्रणासाठी सातारा कृषी...सातारा  : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने...
अमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये...अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून...
राणी सावरगाव येथील चारा छावणीत चौदाशेवर...परभणी  ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात...
येवल्यातील ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाकयेवला, जि. नाशिक : ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण अन्...
धनोली धरणाचे गेट तोडल्याने पाण्याचा...नाशिक   : कळवण तालुक्यातील धनोली येथील...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सेंद्रिय, विषमुक्त शेतीचा बांधापर्यंत...पुणे: सेंद्रिय व विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा...
SakalSaamExitPolls : कोकणात युतीचीच लाट...यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला...
SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप,...सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार, - मुबईत युतीला...
SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला...मराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला...
SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात...महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५...
SakalSaamExitPolls : भाजपच्या...महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा...
SakalSaamExitPolls : पश्चिम...आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात...
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...