agriculture-news-marathi-union-water-resource-minister-nitin-gadkari | Agrowon

नदी जोड प्रकल्प तीन महिन्यांत सुरू होणार : गडकरी
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

मुंबई : देशातील पहिले दोन नदीजोड प्रकल्प राज्यात येत्या तीन महिन्यांत सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी  दिली. 

यात गोदावरी नदीच्या खोऱ्यातील दमगंगा-पिंजाळ, तर गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा तापीच्या खोऱ्यातील पार-तापी-नर्मदा या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

दमणगंगा-पिंजाळसाठी दहा हजार कोटी तर पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडून ९० टक्‍के निधी दिला जाणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

मुंबई : देशातील पहिले दोन नदीजोड प्रकल्प राज्यात येत्या तीन महिन्यांत सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी  दिली. 

यात गोदावरी नदीच्या खोऱ्यातील दमगंगा-पिंजाळ, तर गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा तापीच्या खोऱ्यातील पार-तापी-नर्मदा या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

दमणगंगा-पिंजाळसाठी दहा हजार कोटी तर पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडून ९० टक्‍के निधी दिला जाणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

‘‘राज्यात होणारे दोन्ही नदीजोड प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेच्या अंतर्गत केले जाणार आहेत. दमगंगा-पिंजाळ प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार आहेत. या प्रकल्पामुळे गोदावरीच्या खोऱ्यातील नाशिक, नगर आदी भागातील धरणे भरतील.

याचा फायदा मराठवाड्यालाही होईल. तर तापीच्या खोऱ्यातील प्रकल्पाला २० हजार कोटी रुपयांचा खर्च असून त्यात महाराष्ट्र आणि गुजरातने प्रत्येकी एक-एक हजार कोटी आणि उर्वरित १८ हजार कोटी केंद्र सरकार देणार आहे. यासाठी लवकरच दोन्ही राज्यांत या प्रकल्पासाठी करारही होणार असल्याने आतापर्यंत असलेला पाणी वाटपाचा वाद मिटणार आहे,’’ असे गडकरी म्हणाले.

‘शेतकऱ्यांना फायदा होऊन आत्महत्या थांबतील’
या प्रकल्पामुळे धुळे, नाशिक, मालेगाव आदी भागांना मोठा फायदा होणार असून राज्यातील सिंचन क्षमतेत वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, यामुळे शेतकरी आत्महत्याही थांबतील. राज्यात आत्ता २२ टक्‍के सिंचन क्षमता असून ती ४९ टक्‍के क्षमता वाढविता येऊ शकेल. त्यासाठी आम्ही नदीजोड प्रकल्पासोबत अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणार असल्याने २०१८ पर्यंत राज्याची सिंचन क्षमता ४० टक्‍क्‍यांपर्यंत पोचविणार आहे. त्यासाठी आपण केंद्राकडून ५५ ते ६० हजार कोटी रुपये राज्याला मिळतील, असे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील केळी, कापूस, तूर... जळगाव  ः जिल्ह्यात आठवडाभरापासून असलेले...
सांगलीत गूळ ३५५० ते ४२६० रुपये क्विंटलसांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
नाशिकमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची... नाशिक  : गेल्या १८ ऑक्‍टोबरला मोठ्या...
वाढत्या मागणीमुळे अंड्यांच्या दरात वाढ नवी दिल्ली : वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर परिणाम...
ज्वारी - भुईमुग आंतरपिकासाठी खताचे...आफ्रिकेच्या काही भागामध्ये शेतकरी ज्वारीमध्ये...
ढगाळ हवामानामुळे सांगलीतील द्राक्ष... सांगली :  द्राक्ष हंगामाच्या तोंडावर...
वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीचे केवळ कागदी...वर्धा : शासनाने मोठा गाजावाजा करून १० जुलै रोजी...
शासकीय देणी थकविणाऱ्या कारखान्यांना...पुणे : राज्य शासनाची देणी थकविणाऱ्या साखर...
अकोल्यात बोंडअळी प्रादुर्भावाबाबत... अकाेला : जिल्ह्यात या हंगामात लागवड झालेल्या...
कृषिसेवक भरतीचा तपास सीआयडीकडे द्या पुणे : राज्यात झालेल्या कृषिसेवक भरती...
साध्या यंत्रमागधारकांना व्याजदरात पाच...मुंबई : राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारी,...सद्यस्थितीचा विचार करता पिकानिहाय खालील प्रकारे...
कृषि सल्ला : भाजीपाला, फळभाज्यामिरची : परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१...
नाशिकला टोमॅटोच्या दरातील तेजी कायमनाशिक : जिल्ह्यात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून...
नागपुरात सोयाबीन २८०० रुपये क्विंटल नागपूर ः येथील कळमना बाजारात हंगामातील...
सोलापुरात कांदा वधारला; दर ४००० रुपये... सोलापूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १००० ते ४२०० रुपये... कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडीद, मुगाच्या दरात सुधारणा जळगाव ः डाळ उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
सोलापुरात ऊसदराच्या आंदोलनाची धग कायम सोलापूर ः प्रशासन, कारखानदार यांच्याकडून अद्याप...
‘वान’च्या पाण्यावरील संपूर्ण अारक्षण... अकोला  ः वान प्रकल्प हा मुख्यतः सिंचनासाठी...