agriculture news in marathi, unseasonal rain affect on standing crops, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ हवामानामुळे धास्तावले
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. याचा परिणाम द्राक्षांच्या दरावर झाला आहे. एका दिवसांत दर ३० ते ४० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने द्राक्ष, बेदाणा आणि डाळिंब उत्पादक धास्तावले आहेत. 
 
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. याचा परिणाम द्राक्षांच्या दरावर झाला आहे. एका दिवसांत दर ३० ते ४० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने द्राक्ष, बेदाणा आणि डाळिंब उत्पादक धास्तावले आहेत. 
 
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ढगाळ हवामान होते. असेच वातावरण राहिल्यास द्राक्ष व बेदाणा उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. या वर्षीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे, पन्नास टक्‍के द्राक्षे अजून बागेतच आहेत. मणेराजुरी, सावळज, तासगाव परिसरातील द्राक्ष हंगाम जोरात आहे. तेथील द्राक्षांना दर ही चांगले मिळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अचानक हवामान बदलल्याने शेतकरी चिंता व्यक्‍त करत आहेत.
 
हवामान असेच राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष दरावर होणार आहे. हवामान बदलाचा फायदा घेऊन व्यापारी दर पाडून मागत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा फटका द्राक्षबागायतदारांना बसणार आहे. दोन दिवसांपूर्वी १६० रुपयांनी मागितलेली बाग शनिवारी १३० रुपयांनाही मध्यस्थ घेत नसल्याने द्राक्ष बागायतदार त्रस्त झाले आहेत. 
 

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात लागवड आहे. ढगाळ हवामानामुळे डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

 
मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तर कर्नाटकमधील अथणी, विजापूर तालुक्‍यात सध्या काही द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी रॅकवर आहेत. काही शेतकऱ्यांची द्राक्ष घडांची काढणी सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्या ते बाराव्या दिवसांपर्यंतची द्राक्षे बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत.
 
ढगाळ वातावरणामुळे या बेदाण्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ हवामानामुळे बेदाण्यावर काळे डाग पडून वजनामध्ये घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किलो मागे ३० ते ४० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...