agriculture news in marathi, Unseasonal rain causes crops in state | Agrowon

अवकाळीने धास्ती वाढली; पावसाने पिकांना फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे राज्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गुरुवारपासून ढगाळ हवामानासह कमी-अधिक अवकाळी पाऊस पडत आहे. तर विदर्भात शुक्रवारी (ता. १६) सकाळपासून पावसाला सुरवात झाली होती. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, करडई या रब्बी पिकांसह, भाजीपाला पिके आणिा बहरात असलेल्या आंबा, काजू, काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे राज्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गुरुवारपासून ढगाळ हवामानासह कमी-अधिक अवकाळी पाऊस पडत आहे. तर विदर्भात शुक्रवारी (ता. १६) सकाळपासून पावसाला सुरवात झाली होती. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, करडई या रब्बी पिकांसह, भाजीपाला पिके आणिा बहरात असलेल्या आंबा, काजू, काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

कोकण आंबा, काजूला फटका

 • सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत ढगाळ हवामानसह पाऊस
 • वाढलेली आद्रता व दुपारचे तापमान आंबा आणि काजू पिकांना मारक
 • हंगामाच्या सुरवातीलाच ‘ओखी’ वादळामुळे मोहराचे व कोवळ्या फळांचे नुकसान.
 • फळधारणेवर परिणाम, कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता.
 • काढणीस आलेल्या फळावर पाणी साचून बुरशी येण्याची, फळे डागाळण्याची भीती
 • दमट हवमानामुळे करपा, ढगामुळे ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होणार.

मध्य महाराष्ट्रात रब्बी पिकांना धास्ती

 • पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी हलका पाऊस.
 • पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात शिडकावा.
 • नगर जिल्ह्यामध्ये नगरसह कोपरगाव, अकोले, राहता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा तालुक्यांमध्ये पावसाची रिमझिम.
 • काढणीस असलेल्या गहू, कांदा पिकांचे नुकसान होण्याची धास्ती.
 • पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
 • भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव होणार.
 • पुणे, नगरमधील, सांगलीत द्राक्षांचे नुकसान होण्याची भीती.

मराठवाड्यात गारपिटीनंतर अवकाळीने चिंता

 • मराठवाड्यात विदर्भात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीनंतर पुन्हा अवकाळीने चिंता वाढली.
 • गारपिटीने यापूर्वीच जवळपास १ लाख ४७ हजार हेक्‍टरवरील कोरडाहू, बागायती व फळपिकांचे नुकसान
 • अनेक जिल्ह्यांत ढगाळ हवामान, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस.
 • अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे भिजून नुकसान.
 • पावसाच्या शक्‍यतेने हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती.
 • पीक काढून घेण्यासाठी, काढलेला माल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग.
 • रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, हळद पीक अडचणीत 

विदर्भात संत्रा, आंबा, रब्बी पिके संकटात

 • फेब्रुवारी महिन्यातील गारपिटीने, तसेच सध्याच्या अवकाळीने रब्बी संकटात.
 • सर्वत्र ढगाळ हवामान, अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये हजेरी
 • अकोला, बुलडाणा, वाशीममध्ये पावसाचा शिडकावा
 • ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, टोमॅटो, संत्रा, आंब्याचा मोहोर गळाला.
 • पिकांवर रोग किडींच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता
 • पावसाच्या भीतीने वेळेआधीच गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
 • बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल भिजला. 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...