agriculture news in marathi, unseasonal rain fears farmers on standing crops, marthwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत बहुतांश भागात गुरुवारपासून (ता. १५) आकाशात ढगांची गर्दी तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाची भुरभुर पडत असल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारीच्या मध्यान्हानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाच्या शक्‍यतेने पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ होते आहे. शिवाय जे पीक काढू शकत नाही ते अवकाळी पावसामुळे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. 
 
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत बहुतांश भागात गुरुवारपासून (ता. १५) आकाशात ढगांची गर्दी तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाची भुरभुर पडत असल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारीच्या मध्यान्हानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाच्या शक्‍यतेने पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ होते आहे. शिवाय जे पीक काढू शकत नाही ते अवकाळी पावसामुळे जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. 
 
फेब्रुवारीच्या मध्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने तीन ते चार दिवस मराठवाड्याला झोडपून काढले होते. औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने जवळपास १ लाख ४७ हजार हेक्‍टरवरील कोरडाहू, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावरून सुरू आहे. त्यात आता पुन्हा एकदा दोन दिवसांपासून आकाशात जमणाऱ्या ढगांनी शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
 
शुक्रवारी (ता. १६) औरंगाबाद जिल्ह्यातील ढोरकीन, चित्तेपिंपळगाव, करमाड, भेंडाळा, गणेशवाडी आदी ठिकाणांसह आडूळ परिसरातील काही ठिकाणी तसेच लोहगाव आदी ठिकाणी कुठे हलका पाऊस तर कुठे काही क्षण पावसाची रिमझीम झाली. गंगापूर तालुक्‍यातील भेंडाळा, गणेशवाडी शिवारात पावसाच्या भुरभुरीमुळे काढणीला आलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. 
 
जालना जिल्ह्यातही बहुतांश भागात शुक्रवारी सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी पहायला मिळाली. कुंभार पिंपळगाव शिवारात ढगाळ वातावरणाबरोबरच अधूनमधून पावसाचे थेंब टपकत होते. सकाळपासून सूर्यदर्शनच न झाल्याने उन्हाळ्यात पावसाळ्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.
 
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यातही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिके झाकण्यासाठी, काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...