agriculture news in marathi, unseasonal rain fears farmers on standing crops, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
नगर ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सध्या गहू, कांदा पीक काढणीला आले आहे. पावसाने पिकांचे नुकसान होऊ नये याची शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. त्यामुळे काढणी केलेला गहू, कांदा झाकणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. द्राक्ष उत्पादकही पावसाच्या भीतीने धस्तावले आहेत. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. 
 
नगर ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सध्या गहू, कांदा पीक काढणीला आले आहे. पावसाने पिकांचे नुकसान होऊ नये याची शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. त्यामुळे काढणी केलेला गहू, कांदा झाकणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. द्राक्ष उत्पादकही पावसाच्या भीतीने धस्तावले आहेत. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. 
 
नगर जिल्ह्यामध्ये यंदा एक लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालेली आहे. हरभऱ्याचे क्षेत्रही नव्वद हजारांच्या जवळपास आहे. सध्या गहू ऐन काढणीत आहे, मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातारण असून, अवकाळी पाऊस व गारपिटीची हवामान विभागाने शक्‍यता वर्तवली असल्यामुळे शेतकरी काळजीत आहेत.
हाती आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची काढणी केलेला गहू, हरभरा, कांदा झाकणीसाठी लगबग सुरू आहे.
 
जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी नगरसह कोपरगाव, अकोले, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा भागात पावसाची रिमझिम झाली. ढगाळ हवामानामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे.
 
श्रीगोंदा, संगमनेर आदी भागांत द्राक्ष उत्पादन घेतले जाते. सध्या बऱ्याच ठिकाणी द्राक्षाचीही काढणी सुरू आहे. त्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...